Join us  

राम कपूरनं या अभिनेत्रीसोबत दिला होता १७ मिनिटांचा इंटिमेट सीन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीत माजवली होती खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 7:22 PM

Ram Kapoor : राम कपूरचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षक भडकले होते. अखेर निर्मातीला माफी मागावी लागली होती.

एकता कपूर(Ekta Kapoor)ची 'बडे अच्छे लगते हैं' (Bade Achche Lagte Hai) ही मालिका खूपच लोकप्रिय होती. या मालिकेत राम कपूर (Ram Kapoor) आणि साक्षी तन्वर (Sakshi Tanvar) मुख्य भूमिकेत होते. दोघांच्या रोमँटिक केमिस्ट्रीला चाहत्यांनी भरभरून दाद दिली. त्यांची जोडी आयकॉनिक बनली. फॅन्सही त्यांना रिअल लाईफ कपल मानू लागले. या शोमध्ये दोघांनी १७ मिनिटांचा इंटिमेट सीन दिला होता. त्यानंतर टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. त्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती. एवढेच नाही तर एकता कपूरला माफी मागावी लागली होती.

बडे अच्छे लगते है या मालिकेत राम आणि साक्षी यांचे सुरुवातीला पटत नाही. मात्र कालांतराने ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात असे दाखवण्यात आले होते. त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक दाखवण्यासाठी साक्षी आणि राम कपूरवर अनेक लव्ह मेकिंग सीन्स चित्रीत करण्यात आले होते. या सीन्सची दीर्घकाळ चर्चा रंगली होती. राम आणि साक्षीवर चित्रीत करण्यात आलेला हा इंटिमेट सीन हा तब्बल १७ मिनिटांचा होता. हा सीन मालिकेत दाखवल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप देखील नोंदवला होता.

राम कपूर आणि साक्षी तन्वर आहेत चांगले फ्रेंड्स

राम आणि साक्षीबद्दल बोललो तर दोघे चांगले मित्र आहेत. या शोनंतर ते पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसले. ते दोघे एकता कपूरच्या वेब सीरिजसाठी एकत्र आले होते. कर ले तू भी मोहब्बत या वेब शोमध्ये दोघे एकत्र दिसले होते. या शोमध्ये दोघांचीही रोमँटिक केमिस्ट्री होती. दुसरीकडे, बडे अच्छे लगते हैंचे यश पाहून एकताने त्याचे आणखी दोन सीझन आणले. मात्र, यावेळी कलाकार वेगळे होते. दिशा परमार आणि नकुल मेहता या शोमध्ये दिसले. दुसऱ्या सीझनला भरभरून प्रेम मिळाले. सध्या या शोचा तिसरा सीझन सुरू आहे. मात्र, यावेळी शोला पूर्वीसारखे यश मिळवता आलेले नाही.

टॅग्स :राम कपूर