Join us

राम गोपाल वर्मा करणार आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती

By admin | Updated: November 11, 2016 02:27 IST

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच एका आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तब्बल ३४० कोटी रुपयांचे बजेट असणारा हा चित्रपट वर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट

निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा लवकरच एका आंतराष्ट्रीय चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तब्बल ३४० कोटी रुपयांचे बजेट असणारा हा चित्रपट वर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे बोलले जात आहे. राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर आपल्या या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची माहिती दिलीय. त्यांनी लिहिलेय, माझा सर्वांत मोठा इंटरनॅशनल प्रोजेक्ट ‘न्यूक्लीअर’ हा बिग बजेट चित्रपट आहे. याचे बजेट ३४० कोटींचे आहे. यासोबत त्यांनी या चित्रपटाचा फोटो देखील शेअर केला आहे. आतापर्यंत मी फिक्शन आणि नॉन फिक्शन असे अनेक चित्रपट तयार झाले आहेत. मात्र ‘न्यूक्लीअर’ या विषयावर चित्रपट तयार करण्यात आला नाही. ‘न्यूक्लीअर’ सारख्या विषयावर आम्ही चित्रपट तयार करीत आहोत. हा भारतात तयार होणारा सर्वांत मोठा चित्रपट असेल. हा चित्रपट दहशतवादावर आधारित असून ज्यामध्ये अणुबॉम्ब एका चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास काय होऊ शकते हे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही क रणार आहोत. हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या झळा आजही पाहायला मिळतात, त्याची भयावहता आजही कायम आहे. हे आजच्या काळासाठी किती घातक आहे हे देखील आमच्या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.