Join us  

राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा, म्हणाला, 'शिल्पाने मला चप्पल फेकून...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:02 AM

'UT 69' हा सिनेमा येत आहे ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. मात्र मध्यंतरी ती पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आली होती. आता राज कुंद्राही अभिनयात पदार्पण करत आहे. त्याचा 'UT 69' हा सिनेमा येत आहे ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. हा सिनेमा म्हणजे राज कुंद्राच्या खऱ्या आयुष्यावरच आधारित आहे.

२०२१ मध्ये राज कुंद्रा पोर्नोग्राफी केस प्रकरणी अटकेत होता. तीन महिने त्याला तुरुंगावासा भोगावा लागला. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.'UT 69' सिनेमात तो स्वत:वर झालेल्या आरोपांवर बोलताना दिसणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन वर्षांपासून मास्क घालून फिरत असलेल्या राज कुंद्राने या इव्हेंटमध्ये चक्क आपला चेहरा दाखवला. तसंच त्याने माध्यमांशी खुलेपणाने संवाद साधला. 

पहिल्यांदा जेव्हा राज कुंद्राने शिल्पाला सिनेमाविषयी सांगितले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती. यावर राज कुंद्रा म्हणाला,'मी शिल्पाला स्क्रीप्ट ऐकवली आणि तिच्या उत्तराची वाट बघत होतो. माझी तिच्याजवळ उभी राहायची हिंमत नव्हती मी दूर उभा राहिलो. मी जसं मागे वळून बघितलं माझ्या तोंडावर चप्पल येऊन लागली. तेव्हा मला वाटलं की आता काही हा सिनेमा होत नाही. तरी दिग्दर्शक शहनवाज यांना शिल्पाशी बोलायला सांगितले. कारण मी तिला समजवण्यात अपयशी ठरलो.'

तो पुढे म्हणाला,'शिल्पाने दिग्दर्शकाला विचारलं हा अभिनय करु शकेल का? तेव्हा मी म्हटलं की हो हो मी मेथर्ड अॅक्टिंग करुन आलो आहे जेलमधून सगळं शिकून आलो आहे. करेन मी. तेव्हा कुठे ती तयार झाली. तेव्हा तिला कळलं की ही एक मानवी स्टोरी आहे आणि तिने मला पाठिंबा दिला.'

'UT 69' च्या ट्रेलरमध्ये राज कुंद्राच्या आयुष्यातील वळण दाखवलं आहे ज्यामुळे तो हिरो वरुन झिरो वर आला. यामध्ये त्याचे तुरुंगातील अनुभव दाखवले आहेत. जेलमधील आरोपी राज कुंद्राला 'एडल्ट फिल्मचा किंग' म्हणून हिणवायचे. याशिवाय राज कुंद्राला कोणकोणते अनुभव आले, अडचणी आल्या हे दाखवण्यात आलं आहे. ३ नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्राआत्मचरित्र