Join us

राहुल बनला व्हिलन

By admin | Updated: January 19, 2015 22:25 IST

बिग बॉस हल्ला बोल’मधील उपेन पटेल आणि करिष्मा तन्ना यांच्या लव्ह स्टोरीमध्ये एका व्हिलनची एन्ट्री झाली आहे. हा व्हिलन दुसरा तिसरा कोणी नसून राहुल महाजन आहे.

‘बिग बॉस हल्ला बोल’मधील उपेन पटेल आणि करिष्मा तन्ना यांच्या लव्ह स्टोरीमध्ये एका व्हिलनची एन्ट्री झाली आहे. हा व्हिलन दुसरा तिसरा कोणी नसून राहुल महाजन आहे. ही प्रेमकहाणी शोबाहेर कितपत टिकेल ते माहीत नसले तरीही खरी गंमत वेगळी आहे. बिग बॉसमध्ये महेश भट्ट यांनी भेट देऊन सर्व स्पर्धकांना एक नाटक सादर करण्यास सांगितले. यामधील उपेन-करिष्मा (ऊर्फ उपमा) यांच्या नाटकातील प्रेमकहाणीत राहुल खलनायक बनला आणि महेशना त्याच्या अभिनयाने खूश केले. याआधीच्या बिग बॉसच्या पर्वात महेश आले असताना त्यांनी सनी लिओनला पाहिले आणि पुढील इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे. आता राहुलचे पण नशीब फळफळणार की काय, असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झाला आहे.