Join us  

R Madhavan आणि Surveen Chawla ने सांगितलं सेक्स लाइफचं सीक्रेट, VIDEO तून केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 1:07 PM

सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सुरवीन चावला ( आणि आर माधवन जोरजोरात हसताना दिसत आहेत

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला (Surveen Chawla) नुकतीच तिच्या कास्टिंग काउच अनुभवामुळे चर्चेत होती. एका मुलाखतीत तिने तिच्या वाईट अनुभवाचा खुलासा केला होता. आता तिने अभिनेता आर माधवन (R Madhavan) सोबत मिळून असा खुलासा केला ज्याबाबत ऐकून लोक अवाक् झाले. तिने सांगितलं की, सेक्स लाइफ मसालेदार बनवण्यासाठी कोणत्या डिशचा मोठा हात आहे. 

'चिंचेची चटनी आहे खास'

सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सुरवीन चावला आणि आर माधवन जोरजोरात हसताना दिसत आहेत. एका मुलाखती दरम्यान मुलाखत घेणारी महिला विचारते की, तुम्ही तुमची सेक्स लाइफ कशी स्पायसी बनवता. ती प्रश्न पूर्ण करण्याआधीच सुरवीन म्हणजे चिंचेची चटनी. त्यानंतर ती जोरजोरात हसू लागते. सुरवीनने दिलेलं उत्तर ऐकून आर माधवनही जोरजोरात हसू लागतो. दोघे इतके हसतात की, त्यांच्या डोळ्यातून पाणीही येतं.

लोक करत आहेत मजेदार कमेंट्स

व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये लोकही हसत आहेत. कुणी म्हणत आहेत की, सुरवीनने तिचं सीक्रेट उघड केलं, तर कुणाला दोघांचं हसू पाहून हसू येत आहे. सुरवीन आणि आर माधवन एका वेबसीरीजमध्ये दिसणार आहेत. डीकपल्ड असं या वेबसीरीजचं नाव आहे. ही एका कपलची कहाणी आहे जे वेगळे झाले आहेत.  

टॅग्स :बॉलिवूडवेबसीरिजसुरवीन चावलाआर.माधवन