Join us  

पुल्कित-यामी अफेअर की स्टंट ?

By admin | Published: February 04, 2016 1:46 AM

अभिनेता पुल्कित सम्राट याने २०१४ मध्ये श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केले. ‘सनम रे’ चित्रपटाची शूटिंग सुरू होईपर्यंत त्या दोघांत सर्वकाही व्यवस्थित सुरू होते

अभिनेता पुल्कित सम्राट याने २०१४ मध्ये श्वेता रोहिरा हिच्यासोबत लग्न केले. ‘सनम रे’ चित्रपटाची शूटिंग सुरू होईपर्यंत त्या दोघांत सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. मात्र, जशी पुल्कित आणि यामी यांच्या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली तशी त्यांच्यात कलहाला सुरूवात झाली. तेव्हा पुल्कित व श्वेता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी ‘सनम रे’ चित्रपटाची सहकलाकार यामी गौतम हिच्यासोबत त्याची रिलेशनशिप सुरू झाली. यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आलं. पण जेव्हा श्वेताने त्यांच्यातील या रिलेशनशिपला नाकारले तेव्हा या स्टोरीला खरा अर्थ मिळाला. नंतर पुल्कितने स्पष्ट केले की, त्याची यामीसोबतची रिलेशनशिप ही केवळ चित्रपटासाठीचा स्टंट होता. त्यांच्यात रिलेशनशिप नाही, हे त्याने उघड केले.