Join us

पूजा-अंकुश मराठीतील टॉलेस्ट जोडी!

By admin | Updated: February 10, 2016 01:55 IST

अमिताभ-रेखा, अक्षयकुमार-शिल्पा शेट्टी, विनोद खन्ना-परवीन बाबी, झिनत अमान, रणबीर कपूर-दीपिका पदुकोण अशा किती तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉलेस्ट जोड्या

अमिताभ-रेखा, अक्षयकुमार-शिल्पा शेट्टी, विनोद खन्ना-परवीन बाबी, झिनत अमान, रणबीर कपूर-दीपिका पदुकोण अशा किती तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील टॉलेस्ट जोड्या कायमच प्रेक्षकांच्या मनात राहिल्या आहेत. परंतु मराठीमध्ये अशा जोड्या फारच कमी पाहायला मिळाल्या. पण अंकुश चौधरी आणि पूजा सावंत या जोडीने एकत्र येऊन मराठीमध्येही टॉलेस्ट कपल असल्याचे दाखवून दिले आहे. ‘दगडी चाळ’ या चित्रपटादरम्यान हे दोघेही आॅनस्क्रीन एकत्र आले होते. त्याच दरम्यान त्यांना एका कार्यक्रमासाठी फोटो पोझ द्यायला सांगितली आणि त्याचवेळी त्यांच्या टॉलेस्ट जोडीने एकदम सर्वांचे लक्ष वेधून घेतले.