Join us  

प्रियंका लवकरच आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार

By admin | Published: May 14, 2017 4:54 PM

प्रियंकाला दुसरा हॉलिवूडपट मिळाला असून, ती लवकरच परत न्यूयॉर्कला परतण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमतन्यूयॉर्क, दि. 14 - अमेरिकन टीव्ही शो क्वांटिकोचे दुसरे सिझन आणि बेवॉच या हॉलिवूडपटासाठी प्रियांका ब-याच दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. क्वांटिको आणि बेवॉचला भरभरून प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडचे काही चॅट शो केले होते. हॉलिवूड सेलिब्रिटींसोबत अनेक कार्यक्रमातही ती दिसली. हॉलिवूडमधील चित्रपटांची शूटिंग संपवून भारतात परतली आहे. दिवंगत पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार असल्याचंही समोर आलं होतं. मायदेशात परतल्यानंतर ती या बॉलिवूड चित्रपटासाठी करारबद्ध झाली. अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या बेवॉचची मालिका 25 जूनला प्रदर्शित होणार आहे, त्यातच तिला आता दुस-या हॉलिवूडपटाची ऑफरही आली आहे. प्रियंकाला दुसरा हॉलिवूडपट मिळाला असून, ती लवकरच परत न्यूयॉर्कला परतण्याची शक्यता आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते पॉल बेर्नान यांनी ही ट्विटरवरून घोषणा केली आहे. ते म्हणाले, मी लवकरच एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं मला जिम, क्लेयर आणि प्रियंका चोप्रासोबत काम करण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. सिस्ला होवर्ड या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून, न्यूयॉर्कमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ए किड लाईक जेक या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.