Join us

प्रियंकानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता ?

By admin | Updated: April 3, 2016 14:57 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा माजी मॅनेजर प्रकाश जाजूने प्रियंकानेही आत्महत्येचा प्रत्यत्न केला होता असा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - प्रत्युषा बॅनर्जीच्या आकस्मिक मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधल्या कलाकारांच्या आयुष्यावर चर्चा होत असताना अभिनेत्री प्रियंका चोप्राचा माजी मॅनेजर प्रकाश जाजूने प्रियंकानेही आत्महत्येचा प्रत्यत्न केला होता असा खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. 
 
बॉलिवूड पाठोपाठ हॉलिवूडमध्येही प्रियंका सक्रीय झाल्याने ती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असते. सुरुवातीला प्रियंकाने प्रचंड कठीण काळ पाहिला होता. त्यावेळी आत्महत्येचे विचार तिच्या मनात यायचे पण मी तिला रोखले असा दावा जाजूने त्याच्या टि्वटमध्ये केला आहे.  
 
प्रियंकाचे एका रात्री तिचा पूर्वप्रियकर असीम मर्चंट बरोबर वाद झाला तेव्हा ती, आत्महत्या करण्यासाठी वसईला गेली होती. २००२ मध्ये असीम मर्चंटच्या आईचे निधन झाल्यानंतर प्रियंकाने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा दावा जाजूने केला आहे.
 
प्रियंकाचा प्रकाश जाजूबरोबर वाद झाल्यानंतर तिने त्याच्याबरोबरचा करार रद्द केला होता. त्यानंतर २००८ मध्ये प्रकाश जाजूने प्रियंका विरोधात मुंबईतील न्यायालयात खटला दाखल केला होता. मुलीच्या खाजगी आयुष्यात डोकावतो म्हणून प्रियंकाच्या वडिलांनी जाजू विरोधात खटला दाखल केला होता.