प्रियंकाशिवाय मेरिकॉम दुसरे कोणी बनूच शकत नाही, असे म्हणणे आहे नवोदित दिग्दर्शक उमंग कुमार याचे. मेरिकॉम उमंगचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे. उमंग म्हणाला की, ‘प्रियंकाने मेरिकॉमची भूमिका करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला विश्वास आहे की, ही भूमिका प्रियंकाऐवजी दुसरे कोणी करू शकणार नाही. यापूर्वी चित्रपटाचे निर्माता संजय लीला भन्साळींनीही प्रियंका या चित्रपटासाठी बेस्ट असल्याचे म्हटले होते. प्रियंकाने या चित्रपटात मेरिकॉमप्रमाणेच बॉक्सिंग केली असून, मणिपुरी शैलीत संवाद बोलले आहेत. भन्साळी म्हणाले की, ‘आता हा चित्रपट पूर्ण झाला आहे, तेव्हा असे वाटते की, प्रियंकाऐवजी मेरिकॉमची भूमिका कोणी निभावूच शकत नव्हते. ती ही भूमिका जगली आहे. ही भूमिका तिने रोमा रोमात आत्मसात केली आहे.
प्रियंका चोप्रा परफेक्ट मॅच : उमंग कुमार
By admin | Updated: August 26, 2014 02:17 IST