Join us  

Priya Prakash Varrier : ओरिजनल गाण्यापेक्षाही सुंदर...! प्रिया प्रकाश वारियरने गायलं ‘बेशरम रंग’, क्षणात व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 5:13 PM

Priya Prakash Varrier : प्रिया प्रकाशचा नवा व्हिडीओ व्हायरल, तिचं हे टॅलेंट पाहून अवाक् झाले फॅन्स....

आपल्या अदांनी तरूणाईला वेड लावणारी आणि एका रात्रीत स्टार झालेली प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिचे क्रेज अद्यापही कमी झाले नाही. ‘ओरू अदार लव’ या डेब्यू चित्रपटातील ‘नैनमटक्का’ करणारा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि प्रियाच्या अदांवर लाखो लोक अक्षरश: भाळले. प्रिया एका रात्रीत स्टार झाली. अगदी ‘नॅशनल क्रश’बनली. तुम्हाला कदाचित माहित नसेल की, सर्वांना वेड लावणारी प्रिया प्रकाश ही एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण तितकीच उत्तम सिंगरही आहे. होय, स्वत:च्या युट्युब चॅनलवर व इन्स्टाग्रामवर ती अनेकदा सिंगींग व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिचा एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय आणि चाहत्यांनी तो डोक्यावर घेतला आहे.होय, प्रिया प्रकाशने शाहरूख-दीपिकाच्या ‘पठाण’ या आगामी सिनेमातील ‘बेशरम रंग’ हे गाणं गायलं आहे आणि तिच्या आवाजानं सर्वांना वेड लावलं आहे.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर प्रिया प्रकाशचं कौतुक केलं आहे. तू ओरिजनलपेक्षाही सुंदर गायलीस, अशा कमेंट करत अनेकांनी तिला दाद दिली आहे. जणू तुच हे गाणं गायलंस, अशा शब्दांत एकाने तिचं कौतुक केलं आहे.

प्रिया प्रकाशचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला. ती त्रिशूर येथे विमला कॉलेजमध्ये बी-कॉम फर्स्ट इयरची विद्यार्थी असताना तिला ‘ओरू अदार लव’ हा  सिनेमा मिळाला.‘ओरू अदार लव’ या चित्रपटात तिने एका विद्यार्थिनीचीच भूमिका साकारली होती. आजही तिची क्रेझ कायम आहे.

टॅग्स :प्रिया वारियरपठाण सिनेमादीपिका पादुकोणशाहरुख खान