Join us

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माधुरीचं झाले होते रिजेक्शन

By admin | Updated: May 31, 2016 14:30 IST

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून अनेकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवत आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३१ - बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षित चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यापासून अनेकांच्या ह्दयावर अधिराज्य गाजवत आहे. माधुरीच्या चेह-यावरचे हास्य आणि नृत्याला आजही तोड नाही. माधुरीने स्वत:च्या अभिनय, नृत्य क्षमतेच्या बळावर आज स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. 
 
माधुरीने करीयरमध्ये आज हा टप्पा गाठला असला तरी, या टप्यावर पोहोचण्यापूर्वी माधुरीला नकारही पचवावा लागला होता. तुम्हाला माहित नसेल बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माधुरी आधी दूरदर्शनवर पदार्पण करणार होती. पण दूरदर्शनने तिचा शो नाकारला होता. 
 
स्ट्रगलिंग डे ज मध्ये माधुरीने 'बॉम्बे मेरी है' नावाच्या टीव्ही शो मध्ये काम केले होते. या शो चा पायलट एपिसोडही चित्रित झाला होता. दूरदर्शनला जेव्हा हा पायलट शो दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी शो घ्यायला नकार दिला होता. त्यांना शो मधील कलाकार पसंत पडले नव्हते.