Join us  

प्रथमेश लघाटेने सुरु केला आंब्यांचा व्यवसाय; गायनासोबत सांभाळतोय कुटुंबाचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 2:41 PM

Prathamesh Laghate: यंदाच्या वर्षात प्रथमेशला या बिझनेसमध्ये पत्नी मुग्धाचीही साथ मिळणार आहे.

सारेगमप लिटिल चॅम्पच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय गायक म्हणजे प्रथमेश लघाटे (prathamesh laghate). उत्तम आवाजामुळे चर्चेत येणारा प्रथमेश उद्योजकदेखील आहे. प्रथमेशच्या घरी वर्षानुवर्ष आंब्यांच्या विक्रीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे यावेळीही उन्हाळ्याच्या दिवसांत त्याने त्यांच्या आंबा विक्रीच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने याविषयी माहिती दिली आहे.

नमस्कार! Welcome to Mango season 2024!आंबाप्रेमींच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहोत आत्तापासून. तीच चव, अव्वल दर्जा, तसाच गोडवा. गुढीपाडव्यासाठी लघाटे आंबेवाले यांच्याकडे आपली ऑर्डर त्वरित बुक करा आणि नववर्षाच्या स्वागताची दिमाखदार परंपरा अबाधित ठेवा, असं कॅप्शन देत त्याने त्याच्या व्यवसायाची माहिती चाहत्यांना दिली आहे.

दरम्यान, प्रथमेशच्या घरी गेल्या कित्येक वर्षांपासून आंब्यांची विक्री केली जाते. अस्सल हापूस आंब्यांची ते विक्री करतात. त्यांचा हाच बिझनेस प्रथमेशने पुढेही सुरु ठेवला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षात त्याला मुग्धाही या व्यवसायात साथ देणार आहे.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीसा रे ग म प