Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 12:04 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले. यामागचं कारण अखेर आज प्राजक्ताने स्वतः सोशल मीडियावर शेअर केलेत

प्राजक्ता माळीने काल दोन फोटो शेअर केले. हे फोटो पाहून मराठी मनोरंजन विश्वात चर्चांना उधाण आलं. प्राजक्ताने नेमकी कोणत्या कागदपत्रांवर सही केली, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले गेले. प्राजक्ता आज याविषयी सोशल मीडियावर जाहीर करणार होती. अखेर प्राजक्ताने नुकतंच एक पोस्ट करुन केलेल्या त्या सहीचा उलगडा केलाय. प्राजक्ताने तिच्या पहिल्यावहिल्या भव्यदिव्य अशा पॅन इंडिया सिनेमाची सिनेमाची घोषणा केलीय. 

प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर 'फुलवंती' या तिच्या पॅन इंडिया सिनेमाची घोषणा केलीय. प्रवीण तरडे या सिनेमाच्या संवादलेखनाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहल तरडे सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. 'ओमकारा', 'दृश्यम 2', 'शैतान' आणि  इतर सिनेमांची निर्मिती करणाऱ्या पॅनोरमा स्टूडिओजसोबत प्राजक्ताने हातमिळवणी केलीय. प्राजक्ता या सिनेमाची सहनिर्माती आहे. 'शिवोहम्' या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून प्राजक्ता 'फुलवंती' सिनेमाची निर्मिती करणार आहे.

"माझ्याकडे कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नाहीत. फर्स्ट आर अॉलवेज स्पेशल", अशी पोस्ट लिहून प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'फुलवंती' सिनेमात पेशवेकालीन काळ, नृत्य आणि संगीताची झलक दाखवण्यात येणार आहे. या सिनेमात कलाकार कोणते झळकणार, याविषयी अद्याप उलगडा झाला नाही. याशिवाय प्राजक्ता स्वतः या सिनेमात काम करणार का, हे सुद्धा अजून निश्चित नाही. सरतेशेवटी.. प्राजक्ता निर्मिती करत असलेल्या  'फुलवंती' सिनेमाची उत्सुकता आतापासूनच शिगेला आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठीमराठी अभिनेता