Join us  

Rohit Shetty : धोक्यात आला होता रोहित शेट्टीचा संसार! इमरान हाश्मीची ही अभिनेत्री ठरली होती कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 8:00 AM

Rohit Shetty : होय, इमरान हाश्मीच्या हिरोईनमुळे रोहितचा संसार मोडण्याच्या मार्गावर होता.

रोहित शेट्टी (Rohit Shetty ) बाॅलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. वयाच्या १४ व्या वर्षी रोहितने दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेतला. १७ व्या वर्षी दिग्दर्शक कुकू कोहली यांच्यासोबत अजय देवगणचा फूल और कांटे या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्याला संधी मिळाली. यानंतरची १३ वर्षे त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनच काम केलं. अखेर २००३ साली त्याने स्वत: सिनेमा दिग्दर्शित करण्याचा विचार केला. अजय देवगणला घेऊन त्याने जमीन हा सिनेमा बनवला. पण रोहितचा पहिलाच सिनेमा सुपरडुपर फ्लॉप गेला. २००५ मध्ये त्याने माया नावाच्या मुलीशी लग्न केलं. रोहितची बायको माया लाईम लाईटपासून दूर राहते. पेशाने ती बँकर आहे. आता रोहित व माया सुखाने नांदत आहेत. पण २०१२ मध्ये दोघांचाही संसार धोक्यात आला होता. होय, इमरान हाश्मीच्या हिरोईनमुळे रोहितचा संसार मोडण्याच्या मार्गावर होता.

ही अभिनेत्री कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तिचं नाव प्राची देसाई. होय, रोहित शेट्टी बोल बच्चन सिनेमा बनवत असतानाच त्याच्या व प्राचीच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा होती. अगदी जयपूरमध्ये शूटींगदरम्यान दोघांच्या रोमॅन्टिक डिनर डेटच्या बातम्याही त्यावेळी झळकल्या होत्या.

असं म्हणतात की, प्राची देसाईसोबतच्या अफेअरमुळे रोहितचं लग्न मोडण्याच्या मार्गावर होतं. अर्थात असं काहीही घडलं नाही. लवकरच प्राची व रोहितचं ब्रेकअप झालं. दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. चर्चा खरी मानाल तर, रोहितला पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. कालांतराने प्राची व रोहित त्याआधीच वेगळे झालेत. दोघंही आपल्या नात्यावर कधीच बोलले नाही. मात्र या अफेअरची चर्चा तेव्हा जोरात होती.

टॅग्स :रोहित शेट्टीप्राची देसाईबॉलिवूड