Join us  

Video: प्रभूदेवाने दिला Naatu Naatu ला हटके टच; मोठ्या ग्रुपसह केला जबरदस्त डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 6:44 PM

Prabhu deva: प्रभूदेवाने नुकताच त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभूदेवाने नाटू नाटूवर ग्रुप डान्स केला आहे.

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय सिनेमाने इतिहास रचला आहे. RRR चित्रपटाच्या 'नाटू-नाटू'ला (Natu natu) सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे हे गाणं सुपरहिट झालं असून सध्या प्रत्येकावर त्याची क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. अगदी सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण या गाण्यावर रिल्स करत आहेत. अलिकडेच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभूदेवा याने या गाण्यावर ताल धरला आहे.

प्रभूदेवाने नुकताच त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभूदेवाने नाटू नाटूवर ग्रुप डान्स केला आहे. विशेष म्हणजे यावेळी ग्रुपमधील प्रत्येकाची एनर्जी कमालीची आहे. या व्हिडीओमध्ये प्रभूदेवा यांनी ब्लँक अँड व्हाइट रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातली आहे.

दरम्यान, प्रभूदेवा बॉलिवूड आणि साऊथमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. सोबतच ते अभिनेतादेखील आहेत. 'नाटू नाटू' गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ऑस्करमध्ये या गाण्यावर परफॉर्मदेखील करण्यात आला. याआधी या गाण्यानं गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला होता. ‘नाटू नाटू’ हे गाणं तेलगूचे सुप्रसिद्ध गीतकार व गायक चंद्रबोस (Naatu Naatu Lyricist Chandrabose) यांनी लिहिलं आहे.

टॅग्स :प्रभू देवाआरआरआर सिनेमाज्युनिअर एनटीआरराम चरण तेजा