Join us

सुबोध-स्वप्नीलच्या 'फुगे'चे पोस्टर रीलीज

By admin | Updated: October 11, 2016 12:34 IST

अभिनेता सुबोध भावे व स्वप्नील जोशी यांच्या बहुचर्चित 'फुगे' चित्रपटाचे पोस्टर रीलिज झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेता सुबोध भावे आणि चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी हे दोन स्टार एकत्र येत असून त्यांच्या बहुचर्चित ' फुगे' या चित्रपटाचे टीझर पोस्टर रिलीज झाले आहे. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुबोध भावेने हे अनोखे पोस्टर रीलीज केले आहे. ' फुगे - प्रेमाची बॅकस्टोरी' असे या चित्रपटाचे नाव असून खास एकत्रित येण्यासाठी या चित्रपटाची कथादेखील त्या दोघांनीच लिहीली आहे. विशेष म्हणजे या दोघांच्या नावांची स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी अशी अदलाबदलही करण्यात आली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील या दोन स्टार कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत.
(स्वप्निल-सुबोध पहिल्यांदा एकत्र)