Join us

पोस्टर बॉईजमध्ये रोहितचीही झलक

By admin | Updated: July 25, 2014 22:52 IST

पो स्टर बॉईज या मराठी चित्रपटात आता दिग्दर्शक रोहित शेट्टीचीही झलक पाहायला मिळणार आहे.

पो स्टर बॉईज या मराठी चित्रपटात आता दिग्दर्शक रोहित शेट्टीचीही झलक पाहायला मिळणार आहे. श्रेयस तळपदेने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात फराह खानसोबत रोहित शेट्टीही अभिनय करताना दिसणार आहे. आजवर या दोन्ही दिग्दर्शकांच्या चित्रपटात अभिनेत्यांनी कॅमियो केला आहे, आता मात्र ते एका अभिनेत्याच्या चित्रपटात कॅमियो करताना दिसतील. लोकांच्या मते श्रेयसने एक नवा ट्रेंड आणला आहे. श्रेयसच्या मते मात्र या गोष्टीकडे ट्रेंड म्हणून पाहणो चुकीचे आहे. तो म्हणाला,‘रोहित आणि फराह दोघेही माङो चांगले मित्र आहेत आणि यशस्वी दिग्दर्शकही. मला या दोघांचेही चित्रपट पाहायला आवडतात. मी जेव्हा पोस्टर बॉईज बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला माहीत होते की, मला त्यांना या चित्रपटात घ्यायचे आहे.