Join us  

परिणीती चोप्रानंतर आता पूजा हेगडे करणार लग्न? क्रिकेटरशी जोडले जातंय अभिनेत्रीचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:13 PM

बॉलिवूडपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये झळकलेली पूजा हेगडे लवकरच लग्नबंधनात अ़डकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

पूजा हेगडे सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या टॅलेंटच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. पूजा शेवटची सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. सध्या पूजा एका वेगळा कारणामुळे चर्चेत आली आहे. 

 'KKBKKJ' सिनेमा दरम्यान पूजाचे नाव अभिनेता सलमान खानसोबत जोडले गेलं होते. त्यावेळी तिने यासगळ्या बातम्यांचं खंडन करत आपण सिंगल असल्याचं सांगितलं होतं. याच दरम्यान पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की पूजा हेगडे मुंबईच्या क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पूजाचे नाव क्रिकेटपटूशी जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी, पूजा हेगडे कर्नाटकातील एका क्रिकेटरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. 

 पूजा हेगडेने अफेअरच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. पूजा हेगडेने अलीकडेच एका मुलाखीत ती सिंगल असल्याचं सांगत  सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. अशा अफवांकडे लक्ष देत नसल्याचं म्हटलं होतं होतं. 

पूजा हेगडे गेल्या 10 वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. या दशकभरातील कारकीर्दीत तामिळ, तेलुगूमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे तिने केले आहेत. हिंदीत मात्र केवळ चार सिनेमात ती झळकली. आपल्या पहिल्याच हिंदी सिनेमात ऋतिकसारखा हिरो आणि आशुतोष गोवारीकरसारखां दिग्दर्शक तिला लाभला. आता तिला मोठमोठ्या बॅनर्सचे सिनेमे मिळू लागले आहेत. 

टॅग्स :पूजा हेगडे