Join us  

"जा, जाऊन तोंड धुवून ये..." Dil Seच्या डायरेक्टरनी शूटींगवेळी प्रीती झिंटाला असं म्हटलं अन्...  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:15 AM

अभिनेत्री प्रीती झिंटाने ( Preity Zinta ) ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहत असते...

अभिनेत्री प्रीती झिंटाने ( Preity Zinta ) ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहत असते... तिच्या गालावरील खळीने त्या काळात अनेकांना तिच्या प्रेमात पाडले... प्रीतीने तिच्या कारकीर्दित अनेक चित्रपट गाजवले आणि Dil Se हा तिचा पहिलाच चित्रपट होता. काल प्रीतीने 'दिल से' चित्रपटाच्या शूटींगचा किस्सा सांगितला. मणिरत्नम यांच्या 'दिल से'साठी शूटींग दरम्यानची आठवण सांगितली. हा तिचा पहिलाच चित्रपट असल्याने ती खूप उत्सुक होती, परंतु शूटींगच्या पहिल्याच दिवशी तिला चकीत करणारा अनुभव आला. प्रीतीने दिल सेच्या सेटवर काढलेला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांनी तिला शूटींगच्याआधी मेक अप असलेला चेहरा धुवून येण्यास सांगितले होते.  

प्रीती झिंटाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिल से दरम्यानची तिची आठवण सांगितली. ती मणिरत्नम आणि तिचा सहकलाकार शाहरुख खानसोबत काम करण्यास उत्सुक होते. पण, शूटींगच्या पहिल्याच दिवशी मणिरत्नम यांनी तिला मेकअप काढून टाकण्यास सांगितले. ते तिला जा जाऊन तोंड धुवून ये असे म्हणाले, हे ऐकून प्रीती जरा बुचकळ्यात पडली होती. 

तिने इंस्टावर लिहिले की, “हा फोटो पहिल्या दिवशी दिल सेच्या सेटवर काढला होता. मणिरत्नम सर आणि शाहरुख खान यांच्यासोबत काम करताना मी खूप उत्साहीत होते. मणिरत्नम सरांनी मला पाहिले तेव्हा ते हसले आणि नम्रपणे मला तोंड धुण्यास सांगितले... पण सर, माझा मेकअप उतरेल, मी हसत म्हणाले... मला तेच हवे आहे... कृपया चेहरा धुवा... ते परत हसले. मला वाटले तो मस्करी करत आहे. मग मला कळले की ती मस्करी नव्हती.''

त्या चित्रपटातील मेकअप न केलेला फोटो तिने या पोस्टसोबत पोस्ट केला आहे आणि त्यात सुंदर दिसण्यासाठी सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांचे तिने आभार मानले. तिने पुढे लिहिले की,“मी संतोष सिवन (आमचे छायाचित्रण संचालक) यांचे आभार मानते, मी मेकअप धुवून आल्यानंतर त्यांनी काढलेला हा सुंदर फोटो काढला आणि या चेहऱ्याने चित्रीकरण केले. माझ्या मते त्यांनी दिल से हे चित्रिकरण केले. #throwbackthursday #Dilse #Memories #Ting (sic)” 

१९९८ मध्ये दिल से हा चित्रपट रिलीज झाला, तेव्हा त्याला बॉक्स ऑफिसवर सरासरी प्रतिसाद मिळाला. एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेले प्रीतीचे, जिया जले हे या चित्रपटातील सर्वात संस्मरणीय गाण्यांपैकी एक आहे.

टॅग्स :प्रीती झिंटामणी रत्नम