Join us  

'प्लीज हा अ‍ॅक्ट व्हायरल करा..', रामायणावरील नृत्य नाटिका परफॉर्मन्स पाहून शिल्पा शेट्टीने केली विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 1:34 PM

रामायणातील 'तीन देवियाँ' हे प्रमुख कथानक पहाताना भारावून गेलेल्या गीता माँने शोच्या चार सीझनमधील 'सर्वात दैवी अ‍ॅक्ट' असे संबोधले.

प्रतीती आणि श्वेता, या सुपर डान्सर ४ ला दर आठवड्यात भारतीय शास्त्रीय नृत्याचा साज चढवत आहेत. त्यांना इंडियाज बेस्ट डान्सर स्पर्धेतील माजी स्पर्धक साधवी मजुमदार याची साथ मिळेल. रामायणातील कथाची विण घालत राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघताना, लक्ष्मण शूर्पनखाचे नाक कापताना, रावणाकडून सीतेचे अपहरण, रामाकडून रावणाचा वध आणि अयोध्येत राम, लक्ष्मण, सीता यांचे पुनरागमन दर्शवण्यात आले. तसेच मूळच्या सांस्कृतिक नृत्य नाटिकेच्या माध्यमातून या कथा सांगण्यात आल्या. त्यामुळे हे पाहताना आकर्षक, सृजनात्मक नृत्यदिग्दर्शन आणि सुंदरपणे पार पाडलेला एकूणच परफॉर्मन्समुळे परीक्षक आणि विशेष पाहुणे बादशहाने उभे राहून सलामी, शिडीची सलामी दिली आणि हे व्हायरल आणि ग्लोबल होण्याची इच्छा व्यक्त केली.

रामायणातील ‘तीन देवियाँ’ हे प्रमुख कथानक पहाताना भारावून गेलेल्या गीता माँने शोच्या चार सीझनमधील ‘सर्वात दैवी अ‍ॅक्ट’ असे संबोधले. अनेक व्यक्तिरेखा आणि विविध भावना एकाच परफॉर्मन्समध्ये स्टेजवर सादर केल्याबद्दल तीन डान्सरचे कौतुक केले. तसेच भविष्यात यावर सांगितिक सादरीकरण करण्याची विनंतीही तिने केली.

रॅपर बादशाहदेखील या सादरीकरणाने प्रभावित झाला आणि त्याला या विकेंडचा ‘बेस्ट अ‍ॅक्ट’ असे म्हटले. गीता माँ शी सहमत होत, त्यानेही या तिघांना शास्त्रीय नृत्याची जोपासना करत जगासमोर त्याचे सादरीकरण करण्याचे प्रोत्साहन दिले. हा अ‍ॅक्टला तुम्ही प्लीज जगभरात घेऊन जा. मी पैसे खर्च करत नाही पण मी या अ‍ॅक्टसाठी पैसे खर्च करेन. मी पहायला येणार. मी जगभरात सादरीकरण केले आहे. मला वाटते की, तुम्ही हे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवावे, अशी विनंती बादशाहने निर्माते आणि सादरकर्त्यांना केली. 

अनुराग दादाने अभिमानाने म्हटले की, या परफॉर्मन्समुळे त्याला नशीबवान असल्यासारखे वाटते. ज्या देशाला अशा प्रकारचा समृद्ध सांस्कृतिक इतिहास आणि वारसा आहे. तसेच नृत्य, संगीत आणि नाटकांची परंपराही लोक मनापासून साजरी करतात. रामायण पुन्हा भव्य स्वरुपात सादर केल्याबद्दल त्यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले.

शिल्पा शेट्‌टी कुंद्राने हा सुंदर डान्स बसवल्याबद्दल श्वेताचे अभिनंदन केले आणि म्हणाली, “ पूर्वी रामायण टीव्हीवर सुरु होते, तेव्हा माझी आजी खूप प्रेमाने ते पाहत होती. टीव्ही स्वच्छ करून हाथ जोडून बसत होते. आम्ही तेव्हा लहान होतो. काही घरांमध्ये तर टीव्हीला पुष्पहार घालत असत. त्यावेळी ते आम्हाला कळत नव्हते. आज माझे मन करत आहे की उभी राहून हात जोडून हा अ‍ॅक्ट पाहू.

या अ‍ॅक्टने शिल्पा खूप भावूक झाली आणि तिने लोकांना आवाहन केले की,  हा अ‍ॅक्ट प्लीज.. प्लीज व्हायरल करा. नव्या पिढीसाठी विशेषत: लहान मुलांसाठी हा अ‍ॅक्ट प्रत्येकाकडे शेअर झाला पाहिजे. मुलांनी हे पाहायला हवे, हे खरोखर सांगते. हे खूपच सुंदर आहे.” 

टॅग्स :शिल्पा शेट्टीसुपर डान्सर