Join us  

‘KGF 2’ ने 1000 कोटी कमावण्यासोबतच रचले हे सात रेकॉर्ड, जाणून घ्या डिटेल्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 1:36 PM

1 / 8
दिग्दर्शक प्रशांत नील यांचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमानं जगभर धुमाकूळ घातला आहे. सुपरस्टार यशच्या या चित्रपटानं 1000 कोटींवर कमाई करत अनेक विक्रमांवर नाव कोरलं आहे. अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आज आम्ही याच विक्रमांबद्दल सांगणार आहोत.
2 / 8
भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा : होय, ‘केजीएफ 2’ हा 1000 कोटींवर कमाई करणारा चौथा भारतीय सिनेमा आहे. सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत दंगल (2024 कोटी) पहिल्या क्रमांकारवर आहे. बाहुबली 2 (1810 कोटी) व आरआरआर (1115 कोटी) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
3 / 8
सर्वाधिक कमाई करणारा कन्नड सिनेमा : जगभर 1000 कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवल्यानंतर ‘केजीएफ 2’ हा कन्नड सिनेइंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. अगदी या चित्रपटाच्या कमाईच्या जवळपास एकही कन्नड सिनेमा नाही.
4 / 8
ओपनिंग वीकेंडमध्ये सर्वाधिक कलेक्शन : ‘केजीएफ 2’ने अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. ओपनिंग वीकेंडमध्ये ‘केजीएफ 2’ने ‘बाहुबली 2’ला मात दिली. ओपनिंग वीकेंडमध्ये ‘केजीएफ 2’ने वर्ल्डवाईड 552 कोटींचा बिझनेस केला. ‘बाहुबली 2’चं पहिल्या आठवड्यातील वर्ल्डवाईड कलेक्शन 526 कोटी होतं.
5 / 8
पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा: कन्नड सिनेमाच्या हिंदी डब व्हर्जनला पहिल्यांदाच इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 52 कोटींची कमाई केली. ही हिंदी सिनेमाच्या इतिहासारतील सर्वाधिक कमाई आहे.
6 / 8
महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा : कोरोना महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट असा विक्रमही ‘केजीएफ 2’ने नोंदवला आहे. रिलीजनंतर दोन आठवड्यांतच या चित्रपटाचा हिंदी व्हर्जनने 350 कोटींचा गल्ला जमवला.
7 / 8
अ‍ॅडव्हान्स बुकींगमध्ये अव्वल : ‘केजीएफ 2’ने रिलीजआधीच एका विक्रमावर नाव कोरलं. चित्रपटाने निव्वळ अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 60 कोटींची कमाई केली. ‘बाहुबली 2’ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 58 कोटी कमावले होते.
8 / 8
रिजनल सिनेमाचेही मोडले अनेक विक्रम : ‘केजीएफ 2’ने रिजनल रेकॉर्डही रचले. ओडिशात 10 कोटी कमावणारा हा पहिला सिनेमा ठरला. केरळमध्ये सर्वाधिक वेगवान असं अर्धशतकी कमाई करण्याचा विक्रमही या चित्रपटाने रचला. मुंबई व तामिळनाडूत या चित्रपटाने प्रत्येकी 100 कोटींचा बिझनेस केला.
टॅग्स :केजीएफयशTollywood