Join us  

मिनाक्षी शेषाद्रीचा नवरा कोण आहे? अभिनय सोडून अमेरिकेत झाली स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 4:48 PM

1 / 8
दामिनी, शहेनशाह आणि घायाळ यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची जादू पसरवणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री(Meenakshi Sheshadri)चे आजही करोडो चाहते आहेत.
2 / 8
मीनाक्षी शेषाद्री आज जरी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांना तिची अदा आवडायची. मीनाक्षी शेषाद्री हिचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते ज्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अगणित सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
3 / 8
बॉलिवूडच्या दिग्गज दिग्दर्शक व अभिनेत्यांसोबत तिने काम केले. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. पण नाव, प्रसिद्धी, पैसा असं सगळं काही असताना मिनाक्षीने एकाएकी सिनेसृष्टीला रामराम ठोकला.
4 / 8
केवळ बॉलिवूडच नाही तर देश सोडून ती अमेरिकेत स्थायिक झाली.
5 / 8
मीनाक्षीने पेशाने बँकर असलेल्या हरीश म्हैसूरशी लग्न केले.
6 / 8
लग्नानंतर मिनाक्षी शेषाद्री टेक्सासमधील प्लॅनोमध्ये राहते. तिथे ती आपली नृत्याची आवड जोपासत आहे. टेक्सासमध्ये स्थायिक झालेल्या मिनाक्षीने तेथे कथ्थक अकादमी उघडली असून तरुणींना नृत्याचे धडे देते.
7 / 8
मिनाक्षी शेषाद्रीला एक मुलगा आणि मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तिच्या मुलाचे नाव जोश म्हैसूर व मुलीचे नाव केंड्रा म्हैसूर आहे.
8 / 8
गेल्या काही वर्षांत मिनाक्षी कमालीची बदलली आहे. इतकी की, तिला ओळखणंही कठीण आहे.
टॅग्स :मिनाक्षी शेषाद्री