Join us  

Vinali Bhatnagar : 'किसी का भाई किसी के जान'मध्ये शहनाजला टक्कर देणारी विनाली नेमकी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 7:00 AM

1 / 9
ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज होतोय. या सिनेमात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल असे अनेक स्टार्स आहेत. शिवाय एक नवा चेहरा देखील आहे.
2 / 9
सलमानने आत्तापर्यंत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याच्या चित्रपटातून अनेक अभिनेत्रींनी डेब्यू केला. आता 'किसी का भाई किसी की जान'मधून आणखी एका अभिनेत्रीचा डेब्यू होतोय.
3 / 9
होय, हा नवा चेहरा आहे विनाली भटनागर हिचा. 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे. आता ती कोण हे जाणून घेऊ यात...
4 / 9
विनाली या सिनेमात पलक तिवारी व शहनाज गिलला टक्कर देताना दिसतेय. 'किसी का भाई किसी की जान' हा विनालीचा पहिलाच सिनेमा आहे.
5 / 9
विनाली भटनागरचा जन्म 20 एप्रिल 1996 रोजी भोपाळ, मध्य प्रदेश येथे झाला. विनाली भटनागरने तिचे शालेय शिक्षण भोपाळमधून केले आणि त्यानंतर फॅशन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली.
6 / 9
२०१७ साली फेमिना मिस छत्तीसगडचा खिताब जिंकला होता. वयाच्या १७ व्या वर्षी तिने आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये मदत करायला सुरूवात केली.
7 / 9
पण याचदरम्यान तिचं मॉडेलिंग करिअरही सुरू होतं. कॅडबरी, लॉरयाल डिजिटल, चेन्नई सिल्क्सच्या अनेक जाहिरातीत ती झळकली.
8 / 9
काफिले नूर के या म्युझिक व्हिडीओमध्ये तिला संधी मिळाली. आता ती सलमानच्या सिनेमामुळे लाईमलाईटमध्ये आली आहे.
9 / 9
ॲक्टिंगसोबतच समाजकार्यातही ती काम करते. अनेक एनजीओंसोबत मिळून तिने कौशल विकास कार्यक्रम राबवत मुलांची मदत केली आहे.
टॅग्स :सलमान खानशेहनाझ गिलबॉलिवूड