Join us  

PHOTOS : टायगर श्रॉफच्या आयुष्यात ‘ती’ची एन्ट्री? दिशा पटानीपेक्षाही आहे हॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 3:47 PM

1 / 10
बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ गेल्या 6 वर्षांपासून दिशा पाटनीच्या प्रेमात होता. पण सध्या त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोरात आहेत. याशिवाय आणखी एक कुजबुज सुरू झालीये.
2 / 10
होय, दिशा पाटनीनंतर आता टायगरच्या आयुष्यात एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याचं मानलं जात आहे. ही अभिनेत्री कोण हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असालच.
3 / 10
तर तिचं नाव आकांक्षा शर्मा. तुम्हाला आठवत असेल की, टायगर व आकांक्षा शर्मा या दोघांनी एका म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केलं होतं.
4 / 10
होय, आय ए अ डिस्को डान्सर 2.0 या 2020 साली आलेल्या म्युझिक व्हिडीओमध्ये टायगर व आकांक्षा एकत्र दिसले होते. यानंतर दोघांनी कॅसेनोवा या म्युझिक व्हिडीओमध्ये सुद्धा एकत्र काम केलं होतं.
5 / 10
टायगरने तो आकांक्षा शर्माला डेट करत असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण ‘बिना आग के धुआं नहीं फैलता...,’ असं म्हणतात ते उगाच नाही. अलीकडे दोघांची इन्स्टाग्राम चिटचॅट व्हायरल झाली होती.
6 / 10
आता ही आकांक्षा शर्मा कोण हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सुक असाल तर ती एक मॉडेल व अभिनेत्री आहे. अनेक जाहिरातीत व काही चित्रपटात तिने काम केले आहे. साऊथच्या चित्रपटांमध्येही ती दिसली आहे.
7 / 10
आकांक्षाने 2020 साली Trivikrama या साऊथ चित्रपटातून डेब्यू केला होता. ती एक उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.
8 / 10
आकांक्षा सोशल मीडियावर ग्लॅमरस व बोल्ड फोटो शेअर करत असते. इन्स्टावर तिचे 684K फॉलोअर्स आहेत.
9 / 10
आकांक्षा प्रचंड बोल्ड आहे. अनेक टॉपलेस फोटो, बिकिनी फोटोंनी तिचं इन्स्टा अकाऊंट भरलेलं आहे. बादशहाच्या जुगनू या म्युझिक व्हिडीओमध्ये आकांक्षा झळकली होती. यातील तिच्या बिनधास्त डान्स मुव्ह्सनी सगळ्यांना वेड लावलं होतं.
10 / 10
टायगर श्रॉफला डेट करत असल्याच्या चर्चांवर अद्याप आकांक्षा काहीही बोललेली नाही. पण दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजतेय, असं कळतंय. आता खरं काय ते लवकरच कळेलच.
टॅग्स :टायगर श्रॉफदिशा पाटनी