Join us  

तू मॉडेलसारखी दिसत नाहीस..., ‘गल्ली बॉय’फेम सृष्टी श्रीवास्तवला चक्क तोंडावर सुनावलं गेलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 7:46 PM

1 / 8
2019 मध्ये रिलीज झालेला ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट पाहिला असेल तर एक चेहरा तुम्हाला आठवतं असेलच. तो म्हणजे सृष्टी श्रीवास्तवचा.
2 / 8
म्हणायला सृष्टी या चित्रपटात साईड रोलमध्ये होती. पण तिच्या दमदार अ‍ॅक्टिंगचं चांगलंच कौतुक झालं होतं. सिद्धांत चतुवेर्दी प्रमाणेच या चित्रपटात साईड रोलमध्ये दिसलेल्या सृष्टीचीही बरीच चर्चा झाली.
3 / 8
‘गुलाबो सिताबो’या सिनेमात तर सृष्टीचा अभिनय सगळ्यांना प्रभावित करून गेला़.आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तिच्या वाट्याला फार मोठे रोल आले नाहीत, पण छोट्या छोट्या भूमिकांमधूनही तिने स्वत:ची छाप सोडली.
4 / 8
अर्थात इथपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. तू मॉडेलसारखी दिसत नाही,असं म्हणून तिला हिणवलं गेलं. स्वत: सृष्टीनं याबद्दलचा खुलासा केला आहे.
5 / 8
एका ताज्या मुलाखतीत तिच्या करिअरवर भरभरून बोलली. स्ट्रगल काळातील अनुभवही तिने शेअर केलेत़. ती म्हणाली, ऑडिशनदरम्यान मला बरेच वाईट अनुभव आलेत़. तू मॉडेल बनू शकत नाहीस,असं चक्क माझ्या तोंडावर एक कास्टिंग डायरेक्टर म्हणाला होता.
6 / 8
पुढे तिने सांगितलं, ग्रॅज्युएशननंतर मी अ‍ॅक्टिंग करिअर करण्याचा विचार केला. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये एक फिल्म डायरेक्टर आले होत. मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात होते. त्या दिग्दर्शकांना आपल्या अ‍ॅक्टिंग पॅशनबद्दल सांगावं, म्हणून मी मोठ्या उत्साहात त्यांच्याशी बोलायला गेले. त्यांनी माझं ऐकून घेतलं आणि मग मला थिएटरमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि काही काळानंतर मी ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
7 / 8
ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका भूमिकेसाठी बोलावलं. मी ऑडिशन दिलं. माझी निवड निश्चित आहे,असं वाटलं होतं. पण तसं काहीच घडलं नाही़. तूू मॉडेलसारखी दिसत नाहीस़, असं कारण देत त्यांनी मला ऑडीशनमधून रिजेक्ट केलं होतं,असं तिनं सांगितलं.
8 / 8
ओके जानू आणि दिल जंगली सारख्या चित्रपटांमध्येही सृष्टी झळकली आहे. अनेक वेबसीरिजमध्येही तिने काम केलंय़. गर्ल्स हॉस्टेल या वेबसीरिजमध्ये ती दिसली़. रंगभूमीवरही अनेक नाटकात तिनं काम केलंय.
टॅग्स :गली ब्वॉय