Join us

सूरज-अथियाची लोकमतला भेट

By admin | Updated: September 1, 2015 00:00 IST

बाबांचे हेराफेरी गोपीकिशन हे कॉमेडी चित्रपट मला खूप आवडतात. त्यांचा एक खूप हिट चित्रपट आहे धडकन त्यातील भूमिका करायला ...

बाबांचे हेराफेरी गोपीकिशन हे कॉमेडी चित्रपट मला खूप आवडतात. त्यांचा एक खूप हिट चित्रपट आहे धडकन त्यातील भूमिका करायला मला खूप आवडेल असं अथियाने सांगितलं.

माझे बाबा माझ्यासाठी खूप मोठे आदर्श असून त्यांचे साथी व आतिश हे दोन्ही चित्रपट मला खूप आवडतात असे सूरज म्हणाला. तेच चित्रपट मलाही करायला आवडतील पण त्यात माझ्या वडिलांनी केलेली नव्हे तर विरुद्ध भूमिका करायला मला आवडेल. कारण मी माझ्या वडिलांप्रमाणे इतक उत्तम काम नाही करू शकणार असं त्याने सांगितलं.

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान त्या दोघांना या फिल्ममधून लाँच करतोय त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता दोघांच्याही चेह-यावर हसू फुललं. सलमान सर बाहेर सगळ्यांना रागीट वाटतात पण प्रत्यक्षात ते तसे बिलकूल नाहीत. त्यांचा आमच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला खूप सपोर्ट करतात अस अथिया म्हणाली.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना आम्हा दोघांच्या घरच्यांनीही आम्हाला खूप सपोर्ट केला पण कधीच दबाव टाकला नाही. पण आम्हाला चांगल काम करून त्यांच्या अपेक्षांवर खरं उतरायचं आहे अस सूरज म्हणाला.

या चित्रपटात मी राधाची भूमिका करत असून ती अतिशय हसरी स्वतंत्र आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाची आहे. प्रत्यक्षात मीही तशीच आहे असं अथियाने सांगितलं. मात्र त्या दोघींमधील फरक विचारला असता मी अतिशय रिअॅलिस्टिक आहे आणि राधा तशी बिलकूल नसल्याचे अथिया म्हणाली.

संगीताबरोबरच अतिशय फ्रेश आणि रोमँटिक असा हा चित्रपट असून आशिकी-२ नंतर एवढी छान रोमँटिक मूव्ही ब-याच काळात पडद्यावर आलेली नाही असं अथिया म्हणाली. तर पदार्पणासाठी याहून उत्तम चित्रपट आणि निखिल सर- सलमान खान यांच्यापेक्षा उत्तम मेंटॉर मिळूच शकले नसते अशी कबुली सूरजने दिली.

जुन्या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटातही उत्तम संगीत असून चित्रपटाचे शीर्षकगीत असलेल्या सलमान खानने स्वत: गायलेल्या मै तेरा हिरो या गाण्याला लाखो हिट्स मिळाले आहेत इतरही गाणी बरीच गाजत आहेत त्यामुळे ज्यांना उत्तम संगीत आवडत त्यांनी आवर्जून हा पिक्चर पहावा असा सूरज -अथिया दोघांनीही सांगितलं. आजच्या यंग जनरेशनला टार्गेट ठेवून हा चित्रपट बनवल्याचेही ते म्हणाले.

सुमधुर संगीत जॅकी-मीनाक्षी शेषाद्री यांची हिट जोडी यामुळे ८०च्या दशकात गाजलेल्या हिरो या चित्रपटाचा रिमेक येत असून अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया व आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज ही फ्रेश पेयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांनी नुकतीच लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या.