Join us  

क्रिकेटपासून बॉलिवूडपर्यंत! रोहमन शॉलपूर्वी सुश्मिताने 'या' दिग्गजांना केलंय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:00 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. अलिकडेच सुश्मिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रियकर रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं.
2 / 8
सुश्मिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने 'नातं जुनं झालं होतं. पण, प्रेम कायमच राहिल', असं म्हणत ब्रेकअप झाल्याचं स्पष्ट केलं. तिच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यात रोहमनपूर्वी सुश्मिताने कोणाकोणाला डेट केलं याची चर्चा सुरु झाली आहे.
3 / 8
रोहमन शॉलला डेट करण्यापूर्वी सुश्मिताने क्रिकेटविश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गजांना डेट केल्याचं सांगण्यात येतं. यात सुश्मिताने डेट केलेले ५ लोकप्रिय सेलिब्रिटी कोणते ते पाहुयात.
4 / 8
विक्रम भट्ट - मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुश्मिताचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते विक्रम भट्ट यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. विक्रम भट्ट यांचं लग्न झालेलं असतानाही ते सुश्मिताला डेट करत होते. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाच्यावेळी विक्रम आणि सुश्मिता यांच्यातील जवळीक वाढली होती. परंतु, कालांतराने या दोघांनी ब्रेकअप केला.
5 / 8
रणदीप हुड्डा - आपल्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या रणदीप हुड्डालाही सुश्मिताने डेट केल्याचं सांगण्यात येतं. 'कर्मा', 'कंफेशन' आणि 'होली' या चित्रपटात दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.
6 / 8
वसीम अक्रम- 2013 मध्ये सुश्मिता पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रम याला डेट करत असल्याच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं. ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचंही त्यावेळी सांगितलं जातं होतं. परंतु, लग्नाच्या सगळ्या अफवा असल्याचं सुश्मिताने स्पष्ट केलं होतं.
7 / 8
मुद्दसर अजीज - सुश्मिता दिग्दर्शक मुद्दसर अजीज यांनाही डेट करत होती. सुश्मिताने मुद्दसर यांच्या दुल्हा मिल गया या चित्रपटात काम केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाला. परंतु, त्यांच्या अफेअरची प्रचंड चर्चा झाली होती.
8 / 8
ऋतिक भसीन- मुंबईतील एका रेस्टॉरंटचा मालक ऋतिक भसीन याला सुश्मिता २०१५ मध्ये डेट करत होती. अनेकदा या दोघांना पब्लिक प्लेसमध्येही स्पॉट करण्यात आलं होतं. परंतु, २०१७ मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.
टॅग्स :सुश्मिता सेनरणदीप हुडाविक्रम भटसेलिब्रिटीबॉलिवूड