Join us  

अनंत अंबानींच्या प्री वेडिंगसाठी दिग्गजांची मांदियाळी; जामनगरला पाहुणे पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2024 9:17 AM

1 / 11
बहुप्रतिक्षित अनंत अंबानी आणि राधिका मर्चट यांच्या प्री- वेडिंग' कार्यक्रमांना शुक्रवारपासून जोरदार सुरुवात झाली. दिग्गज सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेटपटू आदींचे जामनगरमध्ये आगमन झाले.
2 / 11
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्च ते ३ मार्च या कालावधीत सुरू होईल. या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे.
3 / 11
'बिग बी' अमिताभ बच्चन, सलमान खान, रणबीर कपूरसह अनेक दिग्गज येथे पोहोचले आहेत. जामनगरजवळील जोगवड गावात सुमारे ५१,००० स्थानिकांना अन्नसेवा देऊन अंबानी कुटुंबीयांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. रणबीर कपूर पत्नी आलिया आणि मुलगी राहा, आई नीतू कपूरसह कार्यक्रमस्थळी पोहोचला आहे
4 / 11
या कार्यक्रमाचे आकर्षण असलेली हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना हिचे आधीच आगमन झाले आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये १ मार्चपासून प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले आहे ज्यामध्ये देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती सहभागी होत आहेत.
5 / 11
बॉलिवूडचे अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत. गायिका रिहाना या भव्य विवाह समारंभात गायनाचा लाइव्ह परफॉर्मन्स देणार आहे. प्री-वेडिंग कार्यक्रमात अरिजित सिंग, प्रीतम, बी, प्राक, दिलजीत दोसांझ यांचे सादरीकरणही पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे
6 / 11
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर आपापल्या कुटुंबियांसह शुक्रवारी गुजरातच्या जामनगर येथे दाखल झाले
7 / 11
ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, इझहीर खान, ड्वेन ब्राव्हो आणि ट्रेंट बोल्ट यासारखे खेळाडूही आले आहेत
8 / 11
कार्यक्रमात अनेक कलाकार आणि गायक सादरीकरण करणार आहेत. जान्हवी कपूर, मानुषी छिल्लर, अभिषेक बच्चन, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, पंजाबी गायक बी प्राक आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा तेजस ठाकरे आधीच पोहोचले आहेत.
9 / 11
अनंत आणि राधिका या जोडप्याने पापाराझींसाठी पोजही दिली. मुंबईतील पॅप्स पाहून हे जोडपे खूप आनंदी आहे
10 / 11
अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगसाठी ठाकरे कुटुंबही जामनगरला गेले, त्याठिकाणी उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य हेदेखील उपस्थित
11 / 11
रणबीर आणि दिपिका पादुकोण हेदोघेही जामनगरला पोहचले असून प्री वेडिंग सोहळ्याला ते हजर असतील.
टॅग्स :मुकेश अंबानी