Join us  

बॉबी देओलचं खरं नाव तुम्हाला माहितीय का?; मुंबईत आलिशान घर, इतक्या कोटींचा आहे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 7:41 AM

1 / 8
१९९५ साली ‘बरसात’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारा अभिनेता बॉबी देओल याचा आज वाढदिवस आहे. ‘बरसात’ या सिनेमानंतर गुप्त, सोल्जर, अजनबी असे काही हिट सिनेमे दिलेत.
2 / 8
बॉबीचे वडील धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. तर त्याचा भाऊ सनी देओल देखील अभिनयक्षेत्रात काम करतो.
3 / 8
बॉलिवूडमधील करिअरमध्ये बॉबी देओलने अनेक चढ-उतार बघितले आहेत. २०१८ मध्ये नशिबाने कलाटणी घेतली आणि सलमानच्या मदतीने ‘रेस 3’मधून बॉबीने पुन्हा कमबॅक केले. पाठोपाठ ‘हाऊसफुल 4’ हा सिनेमाही त्याच्या झोळीत पडला. बॉबीच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
4 / 8
बॉबी देओलच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असल्यास त्याचं खरं नाव अनेकांना माहिती नाही. बॉबी देओलचं खरं नाव हे विजय सिंह देओल आहे. पण मनोरंजनक्षेत्रात तो बॉबी देओल या नावानेच ओळखला जातो.
5 / 8
बॉबीचे मुंबईमधील जुहू भागात आलिशान घर आहे. ज्याची किंमत जवळपास आठ कोटी रुपये आहे. तसेच त्याचं एक फार्म हाऊस देखील आहे.
6 / 8
बॉबी देओल त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी २ ते ४ कोटी रुपये घेतो. यासोबतच त्याची मुंबईत सुहाना आणि सिंपल्स एल्स नावाची दोन चायनीज रेस्टॉरंट्स आहेत, ज्यातून तो भरपूर कमाई करतो. याशिवाय बॉबीची पत्नी तान्या हिचाही द गुड अर्थ नावाचा होम डेकोरेशनचा बिझनेस आहे.
7 / 8
बॉबीला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये त्याच्याकडे लँड रोव्हर, फ्रीलँडर २, रेंज रोव्हर वोग, मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, पोर्श केयेन यासारख्या महागड्या गाड्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती ५० कोटींच्या आसपास आहे.
8 / 8
दरम्यान, बॉबी देओल मोटरसायकल रायडर आहे. चित्रपटातील अनेक स्टंट त्यानं स्वत: केले आहेत. तसेच त्यानं प्रोफेशनल डिजेचं देखील ट्रेनिंग घेतलं आहे. त्यानं काही वेळा डिजे म्हणून देखील काम केलं. डिजे आणि मोटरसायकल रायडर या व्यतिरिक्त बॉबीनं प्लेन उडवायचे देखील ट्रेनिंग घेतले आहे.
टॅग्स :बॉबी देओलबॉलिवूड