Join us  

Farhan-Shibani Wedding: फरहान आणि शिबानीच्या लग्नात 'या' बॉलिवूड सेलिब्रेटींनी लावली हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 5:28 PM

1 / 8
दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर आज फरहान अख्तर शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली. दोघे आज खंडाळ्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले.दोघांनीही आपली Vows (वचने) लिहिलेली वाचली. (Photo Instagram)
2 / 8
फरहानने काळ्या रंगाचा सूट घातला होता, तर शिबानी लाल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली होती. (Photo Instagram)
3 / 8
रिया चक्रवर्ती, आशुतोष गोवारीकर, अमृता अरोरा आणि इतर सेलिब्रिटींनी आधीच आपली उपस्थिती लावली आहे. आता हृतिक रोशन आणि त्याचे कुटुंबीयही फरहानच्या लग्नात सहभागी झाले होते. (Photo Instagram)
4 / 8
पांढरा कुर्ता-पायजामा आणि गुलाबी जॅकेट घातलेला हृतिक नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत होता. त्याच्यासोबत त्याचे आई-वडील पिंकी आणि राकेश रोशनही होते. हे तिघे वेन्यूबाहेर पापाराझींना पोज देताना दिसले.(Photo Instagram)
5 / 8
याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरही फरहान आणि शिबानीच्या लग्नाला हजर होते. दिग्दर्शकाला त्याच्या कुटुंबासोबत लग्नाच्या ठिकाणाबाहेर स्पॉट करण्यात आले. आशुतोष हा फरहान अख्तरच्या जवळच्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत.(Photo Instagram)
6 / 8
पाहुण्यांच्या यादीत फरहानचा बेस्ट फ्रेंड रितेश सिधवानी, मोनिका डोगरा, गौरव कपूर, समीर कोचर, मेयांग चांग यांचा समावेश आहे.(Photo Instagram)
7 / 8
शिबानी स्वत:च लग्न एन्जॉय करताना दिसली, (Photo Instagram)
8 / 8
रिया चक्रवती मैत्रिणीच्या लग्नात पापाराझींना पोज देताना दिसली. (Photo Instagram)
टॅग्स :फरहान अख्तरशिबानी दांडेकर