Join us  

ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 2:16 PM

1 / 12
सेलिब्रिटी म्हटलं की सर्वसामान्य प्रेक्षकांसमोर उभं राहत येते ती त्यांची लक्झरी लाईफस्टाईल. कलाकारांची आलिशान घरं आणि लक्झरी कार या सगळ्याचं प्रेक्षकांना नेहमी अप्रूप वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत. ज्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली तरीही आजही ते आपल्या जुन्या लहानशा चाळीतल्या घरात राहतात. अनेक शो करून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतरही त्यांनी आपल्या चाळीतल्या घराला निरोप दिलेला नाही.चला तर पाहूया असेच काही कलाकार जे लोकप्रियता मिळूनही चाळीत राहणं पसंत करतात.
2 / 12
निखिल बने- महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता निखिल बनेला आज लोकप्रिय झाला आहे. त्याच्या अभिनयाचे बरेच चाहते आहेत. पण निखिल आजही चाळीतल्याच घरी राहतो. अनेकदा तो घरातले काही व्हिडीओस आणि फोटोस सुद्धा शेअर करत असतो. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 12
प्रथमेश परब- लोकप्रिय मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब त्याच्या अभिनयामुळे घराघरात लोकप्रिय आहे. 'टाइमपास' सारख्या चित्रपटाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. इतकी लोकप्रियता मिळवूनही प्रथमेश चाळीतल्या घरात राहत होता. प्रथमेशचं बालपणसुद्धा चाळीतील घरातच गेलं. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 12
अगदी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही प्रथमेश चाळीतल्या घरातच राहायचा. लॉकडाऊन वडिलांना करोना झाल्याने त्याला व संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन होण्यासाठी नव्या घरात शिफ्ट व्हावं लागलं. नाईलाजाने शेवटी त्याला चाळीतलं घर सोडावं लागलं.(फोटो इन्स्टाग्राम)
5 / 12
स्नेहल शिदम - चला हवा येऊ द्या या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणजेच स्नेहल शिदम. अगदी संघर्षांचं जीवन जगून स्नेहल आज मोठी स्टार बनली आहे. तर आजही स्नेहल तिच्या चाळीतल्या लहानशा घरात राहते. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 12
मुंबईच्या विलेपार्ले परिसरात स्नेहलचं चाळीत अगदी साधं आणि लहानसं घर आहे. तर तिथेच तिचं संपूर्ण बालपण सुद्धा गेलं. स्नेहलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्या घरात जागा नाही म्हणून तिला काही बक्षिसं विकावी लागली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 12
मिथिला पालकर - मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री मिथिला पालकरचंसुद्धा बालपण हे चाळीतच गेलं. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अगदी खरं आहे. मुंबईतील दादरमध्ये जुन्या चाळींच्या इमारतीत मिथिला आपल्या आजीआजोबांसोबत राहायची. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 12
इतकच नाही तर मोठी स्टार बनल्यावरही मिथिला इथेच राहते. आताही अनेकदा ती आपल्या आजीसोबत वेळ घालवण्यासाठी इथे येते.(फोटो इन्स्टाग्राम)
9 / 12
गौरव मोरे- अभिनेता आणि कॉमेडीयन गौरव मोरेच्या यशामागेही मोठी संघर्षगाथा आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून गौवरवला मोठी प्रसिद्धी मिळाली. तर आज त्याचे लाखो चाहते आहेत. गौरवचं संपूर्ण बालपण हे मुंबईतील पवई येथील फिल्टरपाडा येथे गेलं आहे. तर आजही तो तिथेच राहतो. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 12
कार्यक्रमात आपली ओळख करून देताना गौरवला आपण चाळीत राहत असल्याची लाज वाटली नाही उलट तो अभिमानाने आपली ओळख फिल्टरपाड्याचा बच्चन अशी करून देतो.(फोटो इन्स्टाग्राम)
11 / 12
प्रिया बापट - आता तुमचा विश्वास बसणार नाही. पण अभिनेत्री प्रिया बापटचं बालपणसुद्धा चाळीतच गेलंय. मुबंईतील दादरच्या रानडे रोड येथे प्रियाचं बालपण गेलं. तर तब्बल २५ वर्षे प्रिया येथेच राहायची. (फोटो इन्स्टाग्राम)
12 / 12
प्रियाने एका मुलाखतीत सांगितलं होतं. की लग्न होईपर्यंत म्हणजेच तब्बल २५ वर्षे ती याच चाळीत राहायची. प्रियाने याच जुन्या चाळीचे काही फोटोस सुद्धा तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. पण याहीपेक्षा मराठी इंडस्ट्रीतील असे बरेच कलाकर आहेत. ज्यांनी सुरूवातीची बरीच वर्षे चाळीतच घालवली आहेत. अभिनेता प्रियदर्शन जाधव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, भाऊ कदम, कुशल बद्रीके असे बरेच कलाकार हे सुरुवातीच्या काळात चाळीतच राहायचे. (फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :प्रथमेश परबमिथिला पालकरप्रिया बापटचला हवा येऊ द्यामहाराष्ट्राची हास्य जत्रा