Join us  

लेकीच्या वयाच्या मुलींसोबत अभिनेत्यांनी थाटलाय संसार; 'या' सेलिब्रिटी कपलमधील एज गॅप ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 5:03 PM

1 / 8
राजेश खन्ना- दिवंगत बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांचं निधन होऊन आज बराच काळ लोटला. मात्र, त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. राजेश खन्ना यांचं ज्या प्रमाणे प्रोफेशनल लाइफ चर्चेत आलं. तसंच पर्सनल लाइफदेखील.
2 / 8
राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे डिंपल कपाडिया या राजेश खन्ना यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान आहेत. ३ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने १९७३ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या वेळी राजेश खन्ना यांचं वय ३१ वर्ष होतं. तर डिंपल यांचं वय १६ वर्ष.
3 / 8
मिलिंद सोमण - फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. मिलिंदने अंकिता कोनवारसोबत लग्न केलं आहे.
4 / 8
अंकिता आणि मिलिंद यांच्या वयात २६वर्षांचं अंतर आहे. लग्नाच्या वेळी अंकिता २७ वर्षांची होती. तर मिलिंदचं वय ५३ वर्ष होतं. या दोघांना अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं.
5 / 8
सैफ अली खान- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या लग्नाविषयी आणि त्यांच्या वयातील अंतराविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. सैफच्या पहिल्या लग्नात करीनाने हजेरी लावली होती. त्यावेळी ती खूप लहान होती.
6 / 8
अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफने करीनासोबत लग्न केलं. आता या दोघांना तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.
7 / 8
संजय दत्त - संजय दत्तने त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत लग्न केलं आहे. संजयच्या पत्नीचं नाव मान्यता आहे. परंतु, लग्नापूर्वी ती दिलनवाज शेख या नावाने ओळखली जायची.
8 / 8
संजय दत्तची लेक त्रिशाला ही मान्यतापेक्षा केवळ १० वर्षांनीच लहान आहे.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसंजय दत्तराजेश खन्नासैफ अली खान मिलिंद सोमण