Join us  

'मिर्झापूर'मधली स्विटी खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, मोनोकिनीतील बोल्ड फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 7:18 PM

1 / 7
महागुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन पिळगांवकर यांची कन्या श्रिया पिळगांवकरच्या ग्लॅमरस फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तिनं एकुलती एक या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर तिनं अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.
2 / 7
श्रिया पिळगांवकर ही सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. तिनं नुकतंच केलेलं फोटोशूट आपल्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.
3 / 7
या फोटोंमध्ये श्रियाचा ग्लॅमरस आणि स्टायलिस्ट लूक पाहायला मिळतोय. तिचं हे फोटोशूट अनेक नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे.
4 / 7
तिनं या लूकसाठई फ्लॉरल मोनोकिनी परिधान केली आहे. यासोबतच तिनं पांढरे कॅनव्हास शूजही घातलेत. या फोटोंसोबत श्रियानं स्पोर्टी स्पाईस असं कॅप्शनही दिलंय. श्रिजा राजगोपाल हिनं तिचा हा लूक डिझाईन केलाय.
5 / 7
श्रियानं 'फॅन', 'हाऊस अरेस्ट', 'भांगरा पा ले' या चित्रपटांमधून तसंच 'मिर्झापूर', 'द गॉन गेम', 'गिल्टी माइंड्स', 'द ब्रोकन न्यूज', 'क्रॅकडाऊन' अशा काही वेब सीरिजमधून भूमिका साकारली आहे.
6 / 7
श्रियाचा हा लूक तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे. अनेकांनी तिच्या फोटोंना लाईक केलंय. तसंच अनेक चाहत्यांनी स्टनर, ब्लुटिफुल अशा कमेंटही केल्या आहेत.
7 / 7
सध्या श्रियाच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. (सर्व फोटो : श्रिया पिळगांवकर/ इन्स्टाग्राम)
टॅग्स :श्रिया पिळगावकरइन्स्टाग्राम