Join us  

'ह्या गोष्टीसाठी इतकी वाट पहिली की ते..'; 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने रायगड जिल्ह्यात बांधलं फार्महाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 12:07 PM

1 / 9
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे.
2 / 9
या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3 / 9
सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील प्रिया म्हणजेच अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर.
4 / 9
ठरलं तर मग या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारुन प्रियाने लोकप्रियता मिळवली आहे.
5 / 9
विशेष म्हणजे प्रियांकाने नुकतंच तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे. प्रियांकाने स्वत:चं फार्महाऊस बांधलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याविषयी माहिती दिली.
6 / 9
प्रियांकाने रायगड जिल्ह्यातील कोलाड या गावात तिचं छानसं फार्महाऊस बांधलं आहे. या फार्महाऊसची एक झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली आहे.
7 / 9
प्रियांकाचं हे फार्महाऊस निसर्गाच्या सानिध्यात आहे. यात तिच्या घरासमोर ओटी, त्यात छान लाकडी झोपाळा, मोठं अंगण, भरपूर झालं, विशेष म्हणजे तुळशी वृंदावन असं सारं काही तिच्या या फार्महाऊसवर पाहायला मिळत आहे.
8 / 9
'खूप वर्षांपासून जे स्वप्नं बघितलं ते २ वर्षांपूर्वी पूर्ण झालं. पण ते खऱ्या अर्थानं पूर्ण झालंय. हे मात्र मला २ दिवसांपूर्वी लक्षात आलं. आपण स्वप्नं पाहतो ते पूर्ण करायला पळतो, कष्ट घेतो. मग लवकर पूर्ण होत नाही म्हणून देवाला, नशिबाला दोष देतो. मग कुठे ते पूर्ण होत. पण ह्या गोष्टीसाठी इतकी वाट पहिली की ते कधी पूर्ण झाल कळलं नाही', असं प्रियाकांने म्हटलं आहे.
9 / 9
पुढे ती म्हणते, '२ दिवसांपूर्वी ही जाणीव झाली की ही सुंदर वास्तू, इथली झाडं,फुल सगळी आपली आहेत. हा व्हरांडा जो काही वर्षां पूर्वी फक्त स्वप्नात असायचा आज तिथल्या झोपाळ्यावर बसून मी माझी आवडती कॉफी पीत आहे. Thank you Mummy pappa तुमच्या स्वप्नात मला सामील केल्याबद्दल आणि देवा आमचं स्वप्नं पूर्ण केल्याबद्दल!'
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीरायगड