Join us  

जुडवा! युजवेंद्र चहलच्या पत्नीसारखीच दिसते सेम टू सेम, कोण आहे ही अभिनेत्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 2:05 PM

1 / 10
क्रिकेटर यजुवेंद्र चहल हा भारताचा स्टार गोलंदाज आहे. चहल त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. चहलबरोबरच त्याची पत्नी धनश्री वर्मादेखील कायमच चर्चेत असते.
2 / 10
चहलची पत्नी धनश्री उत्कृष्ट डान्सर आहे. धनश्रीचे अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत असतात.
3 / 10
धनश्रीने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. धनश्री 'झलक दिखला जा'मधून तिच्या डान्सचा जलवा दाखवत आहे.
4 / 10
पण, सध्या हुबेहुब धनश्रीसारखीच दिसणाऱ्या एका अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
5 / 10
या फोटोत दिसणारी ही अभिनेत्री सेम टू सेम चहलच्या पत्नीसारखीच दिसत आहे. या दोघी जणू काही जुडवा असल्याचं भासत आहे.
6 / 10
हुबेहुब धनश्रीसारखी दिसणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव सुरभी चंदना आहे. सुरभी आणि धनश्रीचे फोटो पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत.
7 / 10
सुरभी चंदना हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 10
तिने 'इश्कबाज', 'नागिन', 'कबूल है', 'संजिवनी' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
9 / 10
२००९ साली 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतून तिने अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती.
10 / 10
२०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉबी जासूस' या सिनेमांतही सुरभी झळकली होती.
टॅग्स :युजवेंद्र चहलटिव्ही कलाकारऑफ द फिल्ड