Join us  

PHOTOS: ‘सोनपरी’ मालिकेतल्या ‘फ्रुटी’त झालाय मोठा बदल, तिला ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 7:00 AM

1 / 8
नव्वदच्या दशकात लहान मुलांसाठी बऱ्याच मालिका प्रसारीत होत होत्या. या मालिकांनी बच्चे कंपनीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
2 / 8
या मालिका आजही ज्यांनी पाहिल्या होत्या त्यांच्या लक्षात आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले बालकलाकार आता मोठे झाले आहेत.
3 / 8
नव्वदीच्या दशकात सोनपरी ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील फ्रूटी ही आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेत परीची भूमिका मृणाल कुलकर्णीने साकारली होती आणि फ्रुटीची भूमिका साकारली होती बालकलाकार तन्वी हेगडे हिने.
4 / 8
तन्वी आता मोठी झाली असून तिने मराठी चित्रपटात काम केलं आहे. ‘सोनपरी’ मालिका सुरू झाली होती तेव्हा तन्वी म्हणजेच फ्रूटी अवघ्या 3 वर्षांची होती आणि तिने करिअरला सुरुवात केली होती. 'जान की कसम' आणि 'गज गामिनी' या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली होती.
5 / 8
तिने 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोन परी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
6 / 8
तन्वी सध्या ती मॉडलिंग करते. तिने मराठी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली आहे. अलिप्त प्रेम योगायोग या चित्रपटात ती झळकली आहे.
7 / 8
तन्वी आता खूपच ग्लॅमरस दिसत असून तिला ओळखणे देखील कठीण जात आहे.
8 / 8
तिने केसाची हेअर स्टाईल देखील बदलली असून ती या लूकमध्ये देखील खूप छान दिसत असल्याचे तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.
टॅग्स :टिव्ही कलाकारमृणाल कुलकर्णी