Join us  

'मराठी बिग बॉस सिझन ३' मध्ये झळकणार प्रसिद्ध कपल, ब्रेकअपनंतर आहेत प्रचंड चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 6:57 PM

1 / 6
या दोघांनी कधीच आपले नात्याविषयी मनमोकळेपणाणे कबुली दिली नव्हती.मात्र सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.
2 / 6
त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.तितकीच ब्रेकअपचीही चर्चा झाली होती.दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना अनफॉलोही केले होते.
3 / 6
ब्रेकअप नंतर दोघांनी सोशल मीडियाव खासगी आयुष्याबद्दल कसलीच माहिती शेअर केली नव्हती. दोघांंचे ब्रेक अप झाल्याचे कळताच त्यांचे चाहतेही नाराज झाले होते.
4 / 6
अक्षया आणि सुयश टिळक दोघांचे ब्रेकअपचे कारण समोर आले नसले तरी चाहत्यांना मात्र मोठा धक्काच बसला होता. 'बिग बॉस मराठी' पर्व 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.अनेक स्पर्धकांची नावही समोर आली.
5 / 6
समोर आलेल्या लिस्टमध्ये आता अक्षया आणि सुयश दोघेही शोमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.यापूर्वी झालेल्या मराठी बिग बॉसमधून काही कलाकरांची लव्हस्टोरी जगासमोर आली होती.
6 / 6
त्यामुळे आगामी भागात आता सुयश टिळक आणि अक्षया देवधर यांचीही लव्हस्टोरी आणि ब्रेकअप स्टोरी समोर येणार हे मात्र नक्की.
टॅग्स :सुयश टिळकअक्षया देवधर