Join us  

सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिलने गुपचूप केले लग्न? जाणून घ्या सिडचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 5:15 PM

1 / 9
‘बिग बॉस 13’ घरात शहनाज प्रचंड लोकप्रिय झाली होती, सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
2 / 9
‘बिग बॉस 13’ संपल्यानंतरही सिडनाज चर्चेत असतात. सध्या काय तर सिडनाजने गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगतेय.
3 / 9
दोघांचेही काही फोटो व्हायरल झालेत आणि यानंतर सिद्धार्थ व शहनाज यांनी लग्न केल्याची चर्चा सुरु झाली.
4 / 9
विशेष म्हणजे, आत्ता नाही तर डिसेंबर 2020 मध्येच या दोघांनी सीक्रेट मॅरेज केल्याचेही म्हटले जातेय.
5 / 9
सिडनाजच्या लग्नाची बातमी ऐकून चाहते एक्ससाइटेड झाले नसतील तर नवल. पण ही एक्ससाईटमेंट फार काळ टिकली नाही.
6 / 9
होय, कारण शहनाजसोबत लग्न केल्याची बातमी अफवा असल्याचे लगेच सिद्धार्थने स्पष्ट केले. अलीकडे शहनाज व सिद्धार्थ एकत्र गोव्यात व्हॅकेशनला गेले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरु झाली होती.
7 / 9
मी अद्याप बॅचलर आहे आणि मीडिया माझे लग्न लावून मोकळा झालाय. कदाचित त्यांना माझ्यापेक्षा अधिक ठाऊक आहे, असा खुलासा सिद्धार्थने केला.
8 / 9
काही दिवसांपूर्वी शहनाज व सिद्धार्थचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत शहनाजच्या गळ्यात मंगळसूत्र व भांगात कुंकू दिसले होते.
9 / 9
पण हा फोटो खरा नसून फोटोशॉप्ड होता, हे कालांतराने स्पष्ट झाले होते. एका फॅनने हा फोटो एडिट केला होता.
टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाशेहनाझ गिल