किती शिकलेले आहेत ‘Shark Tank India’ या हटके रिअॅलिटी शोचे सात ‘शार्क’, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:29 IST
1 / 7नमिता थापर ही मोस्ट फेमस अॅण्ड सक्सेसफुल एंटरप्रेन्योरच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे. ती Emcure Pharmaची एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आहे. ही एक वर्ल्ड वाईड फार्माक्युटिकल कंपनी आहे. नमिताने इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियामधून चार्टर्ड अकाऊंटिंगची ड्रिगी घेतली आहे. तिने ड्युक युनिव्हर्सिटीच्या Fuqua स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केलं आहे.2 / 7विनीता सिंह ही भारतातील सर्वात मोठी कॉस्मेटिक कंपनी ‘शूगर’ची को-फाऊंडर आहे़ तिने दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. यानंतर आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केलं. स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी विनीताने 1 कोटींची प्लेसमेंट ऑफर नाकारली होती.3 / 7अमन गुप्ता हा BOAT चा को-फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे. अमनने दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बीबीए केलं. सीएची प्रवेशपूर्व परिक्षा पास केल्यानंतर तो इंन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियामध्ये गेला. पण एंटरप्रेन्योर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमधून फायनान्स व स्ट्रॅटीजीमध्ये एमबीए केलं.4 / 7‘भारत पे’चा एमडी आणि को-फाऊंडर अश्नीर ग्रोवरने आयआयटी दिल्लीतून सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये बी टेकची डिग्री घेतली. यानंतर आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केलं.5 / 7पियुष बन्सल हा ‘लेन्सकार्ट’चा सीईओ आहे. डॉन बॉस्को स्कूलमधून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी कॅनडात गेला. बेंगळुरूच्या इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्याने एंटरप्रेन्योरशिपची डिग्री घेतली.6 / 7गजल अलग ही ‘मामाअर्थ’ची को-फाऊंडर व चीफ आहे. तिच्याकडे इनफर्मेशन टेक्नॉलॉजीची डिग्री आहे. मॉडर्न आर्ट, डिझाईन आणि अप्लाइड आर्टमध्ये कोर्स करण्यासाठी ती न्यूयॉर्क अॅकेडमी ऑफ आर्ट्समध्ये गेली.7 / 7पीपल ग्रूपचा फाऊंडर व सीईओ आणि शादी डॉट कॉमचा संस्थापक अनुप मित्तल शार्क टँक इंडियाच्या सात शार्कपैकी एक आहे. अनुपम बोस्टन कॉलेजचा विद्यार्थी आहे. ऑपरेशन्स आणि स्ट्रेटेजिक मॅनेजमेंटमध्ये त्याने डिग्री घेतली आहे.