Join us  

माझे मन तुझे झाले..!! लग्नबेडीत अडकली मराठमोळी अभिनेत्री स्वरदा ठिगळे, पाहा वेडिंग अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 1:58 PM

1 / 8
गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडुलकर, अभिनेता ऋषी मनोहर-तन्मई पेंडसे, अभिनेता सिद्धार्थ बोडके- अभिनेत्री तितिक्षा तावडे, पूजा सावंतनंतर आता आणखी एका अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली आहे. ही अभिनेत्री म्हणजे माझे मन तुझे झाले फेम अभिनेत्री स्वरदा ठिगळे (Swarda Thigale).
2 / 8
स्वरदा ठिगळे हिने नुकतेच सिद्धार्थ राऊतसोबत लग्न केले आहे. त्यांचा जानेवारी महिन्यात साखरपुडा पार पडला होता. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर आता ती विवाहबंधनात अडकली आहे.
3 / 8
सोशल मीडियावर स्वरदा आणि सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
4 / 8
स्वरदा ठिगळेचा नवरा सिद्धार्थ राऊत हा डिझायनर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
5 / 8
स्वरदा ठिगळे हिने तिच्या करियरची सुरूवात मराठी कलाविश्वातून केली आहे.
6 / 8
२०१३ साली तिने माझे मन तुझे झाले या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे.
7 / 8
या मालिकेत तिने शुभ्राची भूमिका केली होती. ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.
8 / 8
तसेच २०१७ साली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केले होते. याशिवाय ती स्टार भारत वाहिनीवरील ‘प्यार के पापड’ मालिकेत झळकली होती. शेवटची ती ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती.