Join us  

PICS : वैदेही-शतजन्माचे आपुले नाते : पडद्यावरची वैदेही खऱ्या आयुष्यात आहे चांगलीच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 8:00 AM

1 / 8
सोनी मराठी वाहिनीवरची ‘वैदेही-शतजन्माचे आपुले नाते’ ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. मालिकेतील हसऱ्या चेहऱ्याची, स्वत:आधी इतरांचा विचार करणारी वैदेही प्रेक्षकांचे मनं जिंकून घेतेय. वैदेहीची ही भुमिका साकारली आहे अभिनेत्री सायली देवधर हिने.
2 / 8
देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणा-या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय. या भुमिकेत सायली अगदी फिट बसलीये.
3 / 8
मालिकेत अगदी साधी दिसणारी सायली ख-या आयुष्यात चांगलीच ग्लॅमरस आहे. तिचे इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर तुम्हालाही याची कल्पना येईल.
4 / 8
सोशल मीडियावर सायली चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे आणि तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटोचा भरणा आहे.
5 / 8
याआधीही अनेक भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि तिच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत.
6 / 8
सायली देवधर हा मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीवरील लोकप्रिय चेहरा आहे. लेक माझी लाडकी, जुळून येती रेशीमगाठी सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
7 / 8
सायलीने पुण्यातील अभिनव कला केंद्र या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यातील एका ग्रुपसोबत नाटक करता करता ती अभिनयक्षेत्रात आली आणि इथेच रमली.
8 / 8
सायली सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
टॅग्स :सायली देवधर