Join us  

कौन बनेगा करोडपतीमध्ये एक करोड जिंकल्यानंतर कर भरून स्पर्धकाच्या हातात मिळते इतकी रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 5:37 PM

1 / 8
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2 / 8
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन करतात. अमिताभ बच्चन या कार्यक्रमातील स्पर्धकांसोबत मनसोक्त गप्पा मारतात. त्यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना चांगलेच भावते.
3 / 8
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काही लोक लाखो तर काही करोडो रुपये जिंकतात.
4 / 8
या कार्यक्रमात स्पर्धकाने जिंकलेली सगळी रक्कम त्याला मिळते का असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल ना..
5 / 8
स्पर्धकाने जिंकलेल्या पैशातून कराची रक्कम कापली जाते आणि उर्वरित रक्कम स्पर्धकाला दिली जाते.
6 / 8
प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 56 (2)(ib) नुसार गेम शो, जुगार, सट्टा किंवा लॉटरीत जिंकलेल्या रकमेवर कर भरावा लागतो. हाच नियम कौन बनेगा करोडपतीला लागू होतो.
7 / 8
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक कोटी रुपये जिंकणाऱ्या स्पर्धकाला एकूण रकमेच्या ३० टक्के म्हणजे ३० लाख रुपये कर भरावा लागतो. तसेच ३० लाखांवर १० टक्के सरचार्ज म्हणजे तीन लाख रुपये द्यावे लागतात. तसंच ३० लाखांवर चार टक्के सेस द्यावा लागतो तो एक लाख वीस हजार रुपये होतो. म्हणजे केबीसीत एक कोटी रुपये जिंकणारा स्पर्धक ३४.२ लाख रुपयांचा कर भरून सुमारे ६५ लाख रुपये घरी घेऊन जातो.
8 / 8
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात छोट्यातली छोटी रक्कम जिंकलेल्या स्पर्धकाला जिंकलेल्या रक्कमेवर कर हा भरावाच लागतो.
टॅग्स :कौन बनेगा करोडपती