सुप्रिया पाठारेंच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री, दिसते लयभारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 13:44 IST
1 / 9मराठी टेलिव्हिजनवरील वैविध्यपूर्ण भूमिका साकारुन अभिनेत्री सुप्रिया पाठारे (Supriya Pathare) यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सुप्रिया पाठारे यांनी आतापर्यंत विनोदी, गंभीर, नकारात्मक अशा अनेक भूमिका साकारल्या.2 / 9फार कमी जणांना माहित आहे की, सुप्रिया पाठारे यांची बहीणदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या बहिणीचं नाव आहे अर्चना नेवरेकर (Archana Nevrekar). 3 / 9अर्चना नेवरेकर आणि सुप्रिया पाठारे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. सुप्रिया आणि अर्चना यांनी अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्या बालपणाबद्दलच्या अनेक गोष्टी, संघर्ष सांगितला आहे. 4 / 9आज अर्चना नेवरेकर यांचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने सोशल मीडियावर सुप्रिया यांनी फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा archu, सुखी राहा,समाधानी राहा,हसत राहा,आणि मुख्य म्हणजे जशी आहेस तशीच राहा,खूप खूप प्रेम.5 / 9अर्चना नेवरेकर यांनी एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून अर्चना यांनी मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली. 6 / 9 'वासूची सासू' हे अर्चना यांनी साकारलेले पहिले व्यावसायिक नाटक आहे. 'ती फुलराणी', 'जन्मदाता', 'स्वप्न सौभाग्याचे', 'सुना येती घरा', 'वहिनीची माया' अशा विविध नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केले आहे. 7 / 9अर्चना नेवरेकर यांना चार बहिणी आहेत. त्या अगदी लहान असताना त्यांचे वडील गेले. पुढे कुटुंबाची जबाबदारी अर्चना यांच्यावर येऊन पडली. 8 / 9अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात येण्यासाठी खूप मेहनत घेतली. 9 / 9त्या शाळेत शिकत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांच्या नाटकात बालकलाकार म्हणून कामही केले. पुढे मालिका आणि सिनेविश्वात छोटी मोठी पात्र साकारत त्या मुख्य भूमिकेपर्यंत पोहोचल्या.