Join us  

"तुझ्याशिवाय मजा नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम केल्यानंतर गौरव मोरेचे चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 12:13 PM

1 / 9
'आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टा ना टा ना' असं म्हणत गौरव हास्यजत्रेच्या मंचावर एन्ट्री घ्यायचा. फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेल्या गौरवला हास्यजत्रेमुळे प्रसिद्धी मिळाली.
2 / 9
गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलेल्या गौरवने आता मात्र हास्यजत्रेतून एक्झिट घेतली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला रामराम केल्यानंतर गौरव मोरेचे चाहते नाराज आहेत.
3 / 9
गौरवने पोस्ट शेअर करत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्याचं सांगतिलं आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
4 / 9
'तुझ्याशिवाय हास्यजत्रेत मजा नाही. But all the best. असेच हसवत रहा कारण तुम्ही ज्या स्किट, एपिसोड मध्ये असताना मजा फक्त तिथेच येते', अशी कमेंट एकाने केली आहे.
5 / 9
'तुला नेहमी मिस करू, पुन्हा हास्यजत्रेत येणार ना?', अशी कमेंटही केली आहे.
6 / 9
'पण, कधी कधी हास्यजत्रेत येत जा...तुझी कॉमेडी आणि तुला मिस करतो', असंही म्हटलं आहे.
7 / 9
गौरवच्या नव्या वाटचालीसाठी चाहत्यांनी त्याला कमेंटमधून शुभेच्छाही दिल्या आहेत.
8 / 9
गौरव सध्या 'मॅडनेस मचाऐंगे दुनिया को हसायेंगे' या हिंदी कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
9 / 9
अनेक कॉमेडी शोमध्ये काम केलेल्या गौरवला हास्यजत्रेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर अनेक मराठी सिनेमांमध्येही तो झळकला.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता