Join us  

'ये रिश्ता क्या कहलाता' फेम पारुल चौहानचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून हैराण झाले चाहते, ओळखणं पण झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 11:10 AM

1 / 9
टीव्ही मालिका अभिनेत्री पारुल चौहानने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनेत्रीने तिच्या टीव्ही मालिका बिदाईपासून ये रिश्ता क्या कहलाता है पर्यंत अनेक टीव्ही मालिकांमधून चाहत्यांची मने जिंकली.
2 / 9
तिच्या डस्की लूकमुळे ही अभिनेत्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. तिचा अभिनय आणि लूक या सगळ्यालाच प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
3 / 9
दरम्यान आता तिच्या लूकमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत.
4 / 9
पारुल चौहानला टीव्ही मालिका बिदाई मधून चाहत्यांचे प्रेम मिळाले. नंतर अभिनेत्रीने अनेक शो केले आणि कालांतराने तिचा लूकही बदलू लागला.
5 / 9
अभिनेत्रीने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेत कार्तिक उर्फ ​​मोहसिन खानच्या आईची भूमिका साकारली होती.
6 / 9
पण आता अभिनेत्रीच्या लूकमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. पारुल चौहान तिच्या लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओंनी चाहत्यांना चकित करत आहे.
7 / 9
अभिनेत्री पारुल चौहानने अवजन कमी केल्याचे दिसते आहे.
8 / 9
पारुल चौहानने काळानुसार लूकमध्ये खूप मोठा बदल केलेला पाहायला मिळतो आहे.
9 / 9
पारुल चौहानच्या या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैपारुल चौहान