Join us  

Gurmeet Debina Daughter: देबिना गुरमीतने दाखवली आपल्या धाकट्या लेकीची पहिली झलक, पाहा त्यांचा फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:35 PM

1 / 5
देबिना-गुरमीत यांनी सोशल मीडियावर त्यांच्या दुसऱ्या मुलीची झलक दाखवली आहे. दिविशा मोठी बहीण लियानाची कॉर्बन कॉपी असल्याचे दिसतेय. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 5
फॅमिली फोटोंमध्ये, देबिना आणि गुरमीत त्यांच्या दोन लाडक्या मुलींसोबत कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहेत. देबिनाने तिची धाकटी मुलगी दिविशाला घेतलं आहे, तर गुरमीतने लियानाला आपल्या कडेवर घेतले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण दिविशावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 5
लग्नाच्या 11 वर्षानंतर, या जोडप्याला एप्रिल 2022 मध्ये एक मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी लियाना ठेवले. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 5
दिविशा प्री-मॅच्युअर होती म्हणून देबिना आणि गुरमीतने आपल्या बाळाला बराच काळ लाइमलाइटपासून दूर ठेवले होते. (फोटो- इंस्टाग्राम)
टॅग्स :गुरमीत चौधरीटिव्ही कलाकार