Join us  

वकील बनण्याचे स्वप्न बाजूला राहिले अन् बनली अभिनेत्री, असा आहे पल्लवी सुभाषचा अख्खा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 5:04 PM

1 / 9
छोट्या पडद्याची लोकप्रिय अभिनेत्री ते मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री पल्लवी सुभाषचा (Pallavi Subhash) आज वाढदिवस.
2 / 9
9 जून 1984 रोजी मुंबईत जन्मलेल्या पल्लवीचे पूर्ण नाव पल्लवी सुभाष शिर्के असे आहे.
3 / 9
खरे तर पल्लवीला अभिनेत्री व्हायचे नव्हतेच. तिच्या आजोबांप्रमाणे तिला वकिल होण्याची इच्छा होती.
4 / 9
वकीली करण्याचे स्वप्नं पाहत असतानाच पल्लवीला दिग्दर्शक केदार शिंदेच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि या एका नाटकाने तिच्या आयुष्याची दिशाच बदलली.
5 / 9
‘तु तु मी मी’ हे तिचे पहिले नाटक़ यानंतर पल्लवीने कधीच मागे वळून पाहिले नाही. चार दिवस सासूचे ही मालिका तिला मिळाली. पुढे हिंदी मालिकांमध्येही तिची वर्णी लागली.
6 / 9
तुम्हारी दिशा ही तिची पहिली हिंदी मालिका होती. त्यानंतर ती करम अपना अपना, बसेरा, गोद भराई यासारख्या अनेक हीट मालिकांत ती दिसली.
7 / 9
चक्रवर्ती अशोक सम्राट या हिंदी मालिकेतील तिची राणीची भूमिका विशेष लोकप्रिय झाली. या मालिकेने तिला वेगळी ओळख दिली.
8 / 9
तुझ माझं जमेना, कुंकू झालं वैरी, हॅपी जर्नी, मिरांडा हाऊस, प्रेमसुत्र यासारख्या अनेक मराठी चित्रपटांत काम करण्याची संधी तिला मिळाली.
9 / 9
आयुषमान खुरानाचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. याच चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली होती.
टॅग्स :पल्लवी सुभाष