Join us  

IN PICS: ‘त्या’ एका चुकीमुळं लागला अनिता हसनंदानीच्या करिअरला ब्रेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 3:41 PM

1 / 12
टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करतेय. (Happy Birthday, Anita Hassanandani)
2 / 12
अनिता ही एकेकाळी हिंदी मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींपैकी एक होती. आज तिची लोकप्रियता कायम असली तरी अभिनयसृष्टीतील भाव मात्र उतरला आहे.
3 / 12
आयुष्यात केलेल्या एका चुकीची मोठी किंमत अनिताला चुकवावी लागली.
4 / 12
होय, रोहित रेड्डीसोबत विवाहबंधनात अडकलेली अनिता एकेकाळी बिग बॉस 14 फेम एजाज खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
5 / 12
2005 साली ती अभिनेता एजाज खानच्या प्रेमात पडली. अन् तिथूनच तिच्या करिअरला उतरती कळा लागली असे म्हटले जाते.
6 / 12
अनिता व एजाज एकमेकांवर जिवापाड प्रेम करत. दोघांनीही आपले नाते कधीच मीडियापासून लपवले नाही.
7 / 12
काव्यांजली या सीरिअलच्या सेटवर अनिता व एजाजचे प्रेम बहरले होते.
8 / 12
अनिता एजाजच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, लग्नाची स्वप्नं पाहू लागली होती. पण दुसरीकडे एजाज तिला इग्नोर करू लागला होता.
9 / 12
असे म्हणतात की, एजाज तिला धोका देत होता, अनिताला हे कळायला उशीर झाला. कळले तेव्हा तिलाही धक्का बसला. यामुळेच दोघांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर अनिता काही काळ नैराश्येत होती. याचा परिणाम तिच्या अभिनयावर देखील होत होता.
10 / 12
सेटवर सहकलाकारांसोबत भांडणं केल्यामुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तिच्याकडे बराच काळ काम नव्हते. त्यानंतर तिने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले खरे पण तिला मुख्य भूमिका मिळत नव्हत्या.
11 / 12
अनिताने 1998 साली इधर उधर या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
12 / 12
पहिल्याच मालिकेने तिला तुफान प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर ‘ताल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले़ कभी सौतन कभी सहेली, कोई अपना सा, कसौटी झिंदगी की यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केले.
टॅग्स :अनिता हसनंदानी