Bigg Boss 10 : मोनालिसाची मधुचंद्राची पहिली रात्र बिग बॉसच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 15:16 IST
बिग बॉसच्या घरात धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिणाºया मोनालिसाने बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्याबरोबर बिग बॉसच्याच घरात आपली मधुचंद्राची पहिली ...
Bigg Boss 10 : मोनालिसाची मधुचंद्राची पहिली रात्र बिग बॉसच्या घरात
बिग बॉसच्या घरात धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिणाºया मोनालिसाने बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याच्याबरोबर बिग बॉसच्याच घरात आपली मधुचंद्राची पहिली रात्र साजरी केली. हळद, मेहंदी, वरमाला, रिसेप्शन्स अशा थाटामाटात पार पडलेल्या हा विवाह सोहळ्यात बिग बॉसने आणखी रंगत आणण्यासाठी घरातच या नवदाम्पत्यांना त्यांच्या मधुचंद्रासाठीची व्यवस्था करून दिली होती. या अगोदर २०१० मध्ये सारा खान आणि अली मर्चंट यांचा अशाचप्रकारे धुमधडाक्यात विवाह लावून देण्यात आला होता. गेल्या बुधवारी पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात अनेक भोजपुरी कलाकारांनी हजेरी लावली होती. ‘आज मेरे यार की शादी हैं’ या गाण्याने दिवसाची सुरुवात झालेल्या बिग बॉसच्या घरात लग्नाचा माहोल तयार करण्यात कुठलीच कसर सोडली गेली नाही. बिग बॉसने घरात ‘मेहंदीचा विधी’ पार पडणार असल्याचे जाहीर केल्याने घरतील सर्वच सदस्य हरखून गेले होते. शिवाय मोनालिसाच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा होता. मेहंदी लावण्यासाठी सर्व सदस्य एकत्र जमले असताना त्यांच्यातील संवाद मात्र काहीसा एकमेकांना टोमणे मारण्यासारखा होता. मनवीर गुर्जरने सुरुवातीलाच बानी जे हिची छेड काढताना म्हटले की, तुझ्या शरीरावर टॅटू व्यतिरिक्त अशी कुठे जागा आहे का, जिथे आम्हाला मेहंदी काढता येईल. त्याचबरोबर लोपामुद्रा राऊत हिलाही ‘जरा मेकअप कमी कर जेणेकरून आम्हाला मेकअप नसलेल्या जागेवर मेहंदी काढता येईल’, असे टोमणे मारले. मात्र या सर्व वातावरणात मोनालिसाचा चेहरा बघण्यासारखा होता. मनावर कसलेही दडपण नसल्याचे तिच्या चेहºयावर स्पष्टपणे जाणवत होते. ती हसतमुखाने या सर्व सोहळ्याचा आनंद घेत होती. मात्र जेव्हा तिच्या आईने घरात एन्ट्री केली तेव्हा मोनालिसा खूपच भावुक झाली होती. आईशी आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात ही तिला काही काळ समजलेच नाही. त्यानंतर तिने घरातील सर्वांची ओळख करून दिल्यानंतर तिच्याशी संवाद साधला. विक्रांत सिंह याच्यासोबतच्या लग्नाच्या निर्णयाने मी खूश असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात ज्या दोन लोकांचा (प्रियंका जग्गा, स्वामी ओम) मला त्रास होता, त्यांची घराबाहेर हकालपट्टी केल्याचेही ती म्हणाली. दुसरीकडे विक्रांतही मनवीरशी संवाद साधताना म्हणतो की, जेव्हा केव्हा घरात माझ्याविषयी वाईट बोलले गेले तेव्हा माझे मित्र मला याविषयी सांगत असायचे. मात्र मला कोणाविषयी कुठलीच शंका नाही. याच दरम्यान भोजपुरी अभिनेता निरहुआ, त्याची बहीण आणि अभिनेत्री आम्रपाली घरात एन्ट्री करतात. या दोघांना बघून मोनाच्या आनंदाचा पारावार उरत नाही. ती जल्लोषात त्यांचे स्वागत करते. निरहुआ विक्रांतसोबत घरातील कॅमेºयासमोर म्हणतोय की, जर या दोघांची मधुचंद्राची रात्रही बिग बॉसच्या घरातच साजरी झाली तर या सोहळ्यात खºया अर्थाने रंगत येईल. त्यानंतरच लगेचच बिग बॉस मोनाला कन्फेशन रूममध्ये बोलावतात. नवरीच्या वेशात असलेल्या मोनालिसाला बिग बॉस शुभेच्छा देतात. मोनादेखील बिग बॉसचे आभार मानते. पुढे ती कन्फेशन रूममधून बाहेर पडते, तेव्हा रोहन मेहरा आणि लोपामुद्रा राऊत तिचे कौतुक करतात. मात्र मनू पंजाबी हा वेगळ्याच मूढमध्ये असल्याचे बघावयास मिळते. तो सर्वांसमोर म्हणतो की, ‘आता मी देवदासमधील हमेशा तुमको चाहा’ हे गाणं म्हणायला हवं का?’ अर्थात हे सर्व तो चेष्टामस्करीत म्हणत असतो. पुढे लग्नघटिका समीप येते. मंत्रोच्चार म्हणायला सुरुवात होते, फेरे होतात, मोनाच्या भांगेत कुंकू लावले जाते, एकमेकांना वरमाला घातल्या जातात. सर्व रीतीरिवाजाप्रमाणेच लग्नाचा बार उडवून दिला जातो. नवदाम्पत्य या सोहळ्यासाठी बिग बॉसचे आभारही मानतात. त्यात मनू मोनाला म्हणतोय की, बिग बॉसमुळे तुला नाव, पैसा आणि तुझे प्रेम तुला मिळाले आहे. लग्नात मिस इंडिया आली आहे अन् प्रिन्स आॅफ इंडियाही आला आहे. मध्येच रोहन मनूवर टोमणा मारताना म्हणतोय की, तुला मनूच्या रूपात भाऊही मिळाला आहे. त्यानंतर बिग बॉस घरवाल्यांना धुमधडाक्यात रिसेप्शनचा एक टास्क देतात. ज्यामध्ये मनू आणि मनवीरला होस्ट करायला सांगितले जाते. मनू आणि मनवीर मोनाला म्हणतात की, विक्रांतला असे सांग की, आम्ही जो अॅक्ट करणार आहोत त्याला सीरियस घेऊ नकोस. त्याचदरम्यान घरात रवि किशन एन्ट्री करतात. मग काय, घरातील सर्वच उपस्थित डान्स करीत एकच जल्लोष करतात. विशेष म्हणजे घरात कधीही न नाचणारी बानी जे हीदेखील जबरदस्त डान्सच्या मूढमध्ये बघावयास मिळाली. ती रवि किशनबरोबर डान्स करते. त्यानंतर या दाम्पत्याला केक कापायला सांगितले जाते. त्यावेळेसदेखील एकमेकांना केक भरविताना एकच धमाल केली जाते. पुढे बिग बॉसकडून विक्रांत आणि मोनाला कन्फेशन रूममध्ये बोलावून सरप्राईज दिले जाते. त्यांच्या मधुचंद्रासाठी फुलांनी सजलेल्या रूममध्ये त्यांना पाठविले जाते. त्यानंतर घरातील लाइट्स बंद होतात. मात्र मनू आणि मनवीर यांच्यातील संवाद सुरूच असतात. मनू मनवीरला म्हणतो की, मोनाच्या लग्नामुळे त्याच्या गर्लफ्रेंड पीकूच्या आणि तिच्या घरवाल्याच्या मनात जे गैरसमज निर्माण झाले होते ते सगळे आता दूर झाले आहेत. त्याचबरोबर विक्रांतच्या मनात माझ्याप्रती जो द्वेष होता तोही आता पूर्णत: दूर झाला आहे. मी लग्नात ज्या पद्धतीने सहभागी झालो होतो त्यावरून कोणाच्या मनात काही शंका नसावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, असेही मनू मनवीरला म्हणताना बघावयास मिळाला. धुमधडाक्यात पार पडलेल्या या विवाह सोहळ्यानंतर दुसरा दिवस मात्र पुन्हा कॉम्पिटीशनचा असल्याचे बघावयास मिळाले. मनवीर आणि लोपा एका टास्कमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत होते.